कॉलेज सुरु होण्याआधी भेट देण्यासारखी १० ठिकाणे


Friday, March 2, 2018

जवळजवळ देशातील महाविद्यालये पुन्हा सुरु होण्याची वेळ आली आहे. म्हणजेच आणखी एक सढळ, मुदतींनी भरलेले असाइनमेंट, तणाव आणि अर्थातच निद्रानाशाने भरलेले आणखी एक वर्ष! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यातील सर्व गोष्टींचा उद्रेक होण्याआधीच पूर्णपणे आराम आणि विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच, आम्ही भारतातील ज्या ठिकाणांना आपण पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्यापुर्वी एक एक भेट देऊ शकता अशा ठिकाणांची यादी तयार केली आहे!

भारतात ठिकाणे जिथे भेट देणे आवश्यक आहे

1. ऋषिकेश नदीवरील राफ्टिंग

जगातील फार कमी नद्या गंगेसारख्या अद्भुत आहे. या नदीवर राफ्टिंग एक अवास्तव अनुभव आहे. येथील पांढऱ्या फसफसणाऱ्या पाण्यातून राफ्टींग हा एक वेगळाच अनुभव आहे. हे एक व्यसन आहे जे तुमच्या प्रतीक्षेत आहे! खडबडीत आणि बेलगाम उडणाऱ्या पाण्यात जर तुम्ही राफ्टींग अनुभवले नाही तर हे फारच लाजिरवाणे असेल. पावसाळ्यात नदीच्या झपाटलेल्या प्रवाहात या उपक्रमाचा उत्तम आनंद येतो.

2. अंदमानमध्ये स्कुबा डायविंगवर जा

हे ठिकाण जलप्रेमींचे आहे! माश्यांसोबत पोहणे, रंगीत प्रवाळ आणि तुम्ही आधी कधीही न अनुभवलेली शांती इथे अनुभवा. यांमुळे आपण अंदमानच्या स्कुबा डायविंगचा प्रवास विसरू शकत नाही. अंदमानमधील स्कुबा डायविंग सर्वोत्तम आहे. येथील किनारे आणि उथळ पाण्याचे झरे स्वत: मध्ये आश्चर्यकारक आहेत आणि तर खोल समुद्रातील डाईवंग एक मोहक अनुभव आहे. ज्याप्रमाणे आपण महासागरांसोबत समोरा समोर येतो, शक्यतो ही सर्वात मोठी आणि सर्वात गूढ संकल्पना मानवजातीने क्वचितच अनुभवली असेल. हेवलॉक आयलँड येथे हे नक्की काराच, ज्यासाठी ते सर्वात लोकप्रिय आहे. हे पोर्ट ब्लेअर बेटापासून सुमारे ५० किमी अंतरावर आहे आणि जो नाविन्यपूर्ण आणि बेसुमार असा आहे. जर तुमच्यातील धाडसाची तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल तर रात्रीच्या डाइविंगसाठी एक सत्र बुक करा. भारतात भेट देण्यासारख्या अनेक ठिकाणे आहेत मात्र अंदमान मध्ये भेट देणे म्हणजे स्वर्गाचा आनंद घेण्यासारखे आहे!

3. दार्जिलिंगमध्ये टॉय ट्रेनची सफर करा

हि सफर म्हणजे इतिहास आणि रेल्वे प्रेमींसाठी उत्साहवर्धक आहे! दार्जिलिंगमध्ये टॉय ट्रेनिंग १८०० च्या दशकापासून चालत आहे. आणि दार्जिलिंग पर्वतरांगांच्या खाली आणि खालच्या पठारावर विविध ठिकाणी वाहतूक दुवा म्हणून दार्जिलिंगने टॉय ट्रेनची निर्मिती केली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा म्हणून सत्कार केलेल्या इथे या गाडीतून तुम्हाला मनमोहक दृश्ये पाहायला मिळतील. आजकाल वेगवान असे डिझेल इंजिन्स आहेत, तरी चढावर मागच्या डब्यांना हळू हळू खेचताना आजूबाजूच्या रमणीय भूप्रदेशाचे नयनरम्य दृश्य हळू हळू पाहण्याची संधी आपणास मिळते.

4. आल्लप्पिमधील पूर्व भागांमध्ये सफर करा

महाविद्यालयाची सुरुवात होण्यापूर्वी ‘पूर्वेकडचे वेनिस’ असणाऱ्या या ठिकाणास आपण अजून भेट दिली नसेल, तर आपण आपले संशोधन योग्य करत नाही! आल्लप्पी किंवा अलाप्पुझा, त्याच्या कृत्रिम निद्रा आणणारे बॅकवॉटर, कालवे, भात शेती, नारळाची शेती आणि खारफुटी यांमधून होणारा सर्वात शांत प्रवास, तुमच्या प्रवासकथांमधे नक्की असणार! प्रत्येक वर्षी अलापुझा पुननामदा सरोवर येथे नेहरू ट्रॉफी बोटींची शर्यत चुकवू नका. आकर्षक अलाप्पुझा समुद्रकिनार्याशिवाय, तुम्ही कृष्णपूरम पॅलेस संग्रहालय आणि ठाकझी म्युझियम, ज्यात भरभक्कम व पुरातन वस्तू, हिंदू पौराणिक व प्राचीन साहित्य आहे या ठिकाणी देखील भेट देऊ शकता.

5. गोव्यातील समुद्रकिनार्यांवरची शांतता अनुभवा

कॉलेज ट्रिप आणि गोवा हे जणू समानार्थी शब्द आहेत. मित्रांसमवेत गटाने मजा करताना हातात वाइन कूलरसह आणि हवेमध्ये पसरलेला चवदार सीफूड चा सुगंध गोव्यातील आदर्श दिवसाची सुरवात करतात. नयनरम्य समुद्र किनारी असताना आपण साहसी खेळांची निवड करू शकता जसे की पॅरासेलिंग किंवा उपलब्ध असल्यास बनाना बोट राईड! सर्वात लोकप्रिय बीच पर्याय म्हणजे वॅगेटर बीच, अंजुना बीच, बागा बीच, कॅलंगुट बीच, बोगमालवे बीच इत्यादी. आपले स्विमिंग सुटस पॅक करा आणि सफरीला निघा! भारतामध्ये भेट देण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत मात्र हे आमचे आवडते आहे!

6. मनालीमध्ये साहसी उपक्रमांचा अनुभव घ्या

‘ये जवानी है दिवानी’ प्रकारचे साहस आपल्या नसांमध्ये आहे, आणि प्रवास करण्याची तहान म्हणजे आपली भूक! मनालीचा प्रवास म्हणजे आपल्या साहसाची चाचणी आणि स्वप्नास साहाय्य करण्याचा एक निमित्त! साहसी प्रवासाच्या यादीला सुरवात करण्यापूर्वी आपण खात्री बाळगा की आपल्यामधील साहसी प्रवासी मनालीच्या संपूर्ण प्रवासामध्ये समाधानी राहिल. बोनस आहे की आपल्या चित्रपटप्रेमी मित्र-मैत्रिणीं त्यांची कला तुम्हाला दाखून शकता आणि तुम्ही सर्व आणखी घनिष्ट बनू शकता. व्हाईट वॉटर राफ्टिंग, स्नो ट्रेकिंग, तेजस्वी पांढऱ्या हिल्स आणि पर्वतरांगांवरील कॅम्पिंग अशा उपक्रमांमध्ये सामील व्हा आणि प्याराग्लायडिंग दरम्यान दहा मिनिटे शुद्ध आनंद आणि शांतीचा अनुभव घ्या. थंड हवेला चिरून रिवर क्रोस्सिंग, रॉक क्लाइंबिंग, राप्लिंग, कायाकिंग यांचा उपभोग घ्या.

7. पोंडिचेरीचा अनुभव घ्या सायकलवर!

 

पॉण्डिचेरी, स्वतःच, भारतात भेट देण्याच्या ठिकाणांची आमची यादी बघण्यासाठी एक उत्कृष्ट अनुभव आहे. हा केंद्र शासित प्रदेश शाश्वत आणि पर्यावरणाला अनुकूल अशी वाहतूक व्यवस्था पुरवतो हि वस्तुस्थिती आहे. फ्रेंच स्थापत्यशास्त्राचा ठसा असणारे असे सुंदर पोंडिचेरी शहर इथे इथला अनुभव घेण्यासाठी लोकांना वैविध्यपूर्ण आणि बनवून घेतलेल्या सायकल पुरवतात.

8. निसर्गसंपन्न मेघालयाशी जवळीक साधा

मेघालयातील स्कॉटिश दृश्ये आणि भारतीय मोहिनी यांचे उत्तम मिश्रण आहे. ‘ढगांचे निवासस्थान’ म्हटले गेलेले हे राज्य जगात सर्वात जास्त पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे, शांत सभोवताल, काहीही न थांबणारे धबधबे, नागमोड्या वळणाच्या नद्या, हिरवे चढउतार हे सगळे तुमचे मन आनंदाने भरून टाकतील हे नक्की! संपूर्णपणे वन्यजीवसृष्टीने भरलेल्या इथे हत्ती, वाघ, सोनेरी मांजरी, बिंटौराँग, माकड आणि पक्षीजीवनाची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे. नैसर्गिक सौंदर्याव्यतिरिक्त, मेघालय देशातील सर्वोत्तम गोल्फ कोर्सपैकी एक आहे. मेघालयांच्या पर्यटनांपैकी एक रत्न म्हणजे लिविंग रूट ब्रिज. हे पूल तयार होण्यासाठी १५ वर्षे लागतात, हे त्यांना प्रकृति प्रेमी व साहसी साधकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनविते. इथे प्रत्येकासाठी काहीतरी आहे, अष्टपैलू व प्रिय असे हे ठिकाण महाविद्यालय सुरू होण्याआधी एकदातरी भेट द्यावे असेच आहे.

यापैकी प्रत्येक ठिकाणांसाठी लोकप्रिय पर्यटन पर्यायांचा अनुभव घ्या आणि जर तुमची साहसी आत्मा प्रतिबंध तोडण्यासाठी तयार असेल तर पुढे जा आणि आणि येथील नाविन्यपूर्ण ठिकाणांचा अनुभव घ्या आणि तुमच्यातल्या पर्यटकाला समाधानी करा!

Share This