Travel Blog by Thomas Cook India

जगातील 10 पूल जे तुमच्या हृदयाचा ठाव घेतील

“आपलं रक्त सळसळवणाऱ्या कोणत्याही गोष्टी करणे योग्य आहे” – हंटर एस थॉम्पसन ज्या गोष्टीनी आपले हृदय धडधडते आणि आपल्याला जीवंतपाणाचा अनुभव येतो अशा गोष्टी आपण नक्कीच करतो! बंजी जम्पिंग आणि झिप लाईनिंग सारख्या रोमांचक अनुभवामुळे तुमचा थरकाप नक्कीच उडेल पण आपण उंचीला घाबरत नसाल तरच! तुम्ही जर असे व्यक्ती असाल ज्यांना अॅक्रॉफोबिया (उंचीची भिती) नसल्यास, किंवा गेफ्रोफोबिया (पुलाचे भय) नसल्यास आपण खालील वैशिष्ट्यीकृत असे भितीदायक पूल नक्कीच तपासावे :

जगभरातील पूल

1.कॅनोपी वॉक, घाना:

वृक्षांच्या टोकाच्या इतक्या उंचीवर जाऊन तुम्हाला आनंद मिळतो? तर घानाच्या कॅनोपी नॅशनल पार्कमधे चालताना हा अनुभव नक्कीच येतो! उष्णकटिबंधीय जंगलात, १००० फूटांवर पसरलेले, कॅनोपीमधील सात रस्सीच्या-शैलीत अतिशय छोट्या जागेतल्या झुलत्या पुलावरून चालण्याचा आनंद वेगळाच आहे. जिथे फ़क़्त पक्षी आणि माकडेच पोहोचू शकतात अशा जंगलातील उंच भागांचा हा पूल मागोवा घेतो. या पुलावरून जाताना तुम्ही जमिनीपासून १३० फुटांच्या उंचीवर असता जिथे सुरक्षिततेसाठी फक्त जाळी असते. तर आता एका दगडात दोन पक्षी मारा म्हणजेच आपल्या भीतीवर विजय मिळवा आणि इथल्या सात्विक सौंदर्याचा आनंद मिळवा.

2. लांगकावी स्काय ब्रिज, मलेशिया:

डॉन चित्रपटाच्या शेवटी दाखवलेला, लांगकावी स्काय ब्रिज, आपल्याला समृद्ध वर्षावनांपासून १०० मीटर उंचीवर नेतो. १.८ मीटर रुंदीचा, १२५ मीटर लांब, फक्त ८ केबल्स असणारा हा पूल ८१.५ मीटर उंच द्वारापासून सुरु होतो. जरी हा पूल असुरक्षित वाटत असला तरी हा पर्वतरांगामुळे बनलेल्या भव्य नक्षी आणि वर्षावनांच्या सुंदर दृश्यांनी आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो. तसेच लांगकावी स्काय ब्रिजमध्ये ३ वळणावळणाचे विभाग आहेत जिथून जंगल ओलांडावे लागते. दोन स्टीलचे कठडे आणि एक स्टील वायरचे जाळे हे सर्व आपल्याला खाली पडण्यापासून प्रतिबंधित करतात! हे मात्र तुमच्या हाडांसाठी एक आव्हानच आहे.

3. माउंट टिटलिस ब्रिज, स्वित्झर्लंड:

आपण स्वित्झर्लंडच्या माउंट टिटलिस ब्रिज वर उभे राहू इच्छित असल्यास आपली इछ्याशक्ती देखील तेवढीच मजबूत हवी जेवढ्या इथल्या स्टील च्या केबल! समुद्रसपाटीपासून ३,०४१ मीटर उंचीवर आणि जमिनीपासून ५०० मीटर उंचीवर, हे १०० मीटर लांब पुल फक्त १ मीटर रुंद आहे. जरी आपण सुमारे १५० पायाऱ्यात संपूर्ण पूल ओलांडू शकता, तरी वाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या पुलाच्या हालचालींनी प्रत्येकाच्या ह्रदयाची स्पंदने वाढण्याची खात्री असते. जाळीदार तळ आणि कुंपण यांच्यामुळे आसपासच्या दृश्ये पूर्णपणे जबरदस्त आकर्षक आहेत याची खात्री होते.

4. अग्युएल ड्यू मिडी ब्रिज, फ्रान्स:

फ्रान्समधील अग्युएल ड्यू मिडी डोंगरात खोदलेल्या या पुलावरून चालताना अगदी हिम्मतवाल्यांच्या देखील हृदयाचा थरकाप उडवते. समुद्र पातळीपेक्षा १२,५०० फूट उंचीवर हा छोटा, स्टीलचा पुल, १०० फूट खोल असणाऱ्या कड्यांकडे देखील दुर्लक्ष्य करते. येथील हवा, थंडी आणि सरळ उंच कडे यांचा सामना करा आणि फ्रेंच, इटालियन आणि स्विस आल्प्स यांच्या अविश्वसनीय दृश्यांचा अनुभव घ्या. तसेच प्रसिद्ध मोंट ब्लांकदेखील आपल्याला पाहायला मिळेल.

5. मिलाऊ व्हायाडक्ट, फ्रान्स:

जर जलद गाडी चालवण्याचा विचार आपल्याला उत्तेजित करतो, तर आपल्या अग्रसूचीमध्ये मिलाऊ व्हायाडक्ट नक्की असावा. माशीफ सेंट्रलवर केबलने बांधण्यात आलेला हा पूल २ किलोमीटर लांब आहे. ज्यावर तुम्ही आपली गाडी 110 किमी / ताशी गतीने चालवू शकता. या पुलाची सर्वात जास्त उंची २७० मीटर इतकी आहे. एक निरभ्र दिवशी, आपण फ्रेंच देशाचे एक नेत्रदीपक दृश्य पाहायला मिळेल. आणि जर ढगाळ वातावरण असेल तर पुलाच्या खाली आपल्या ढग दिसतील. जे आपली ड्राइव्ह अविस्मरणीय बनवतील. मिलाऊ व्हायाडक्टवर वाहन चालवण्यासाठी आपणास जुलै आणि ऑगस्ट मध्ये ८.९० युरो टोल शुल्क भरावे लागेल. उर्वरित वर्षांसाठी, समान शुल्क म्हणजे 7 युरो आहे. तर ढगांमध्ये वाहन चालवण्याची संधी चुकवू नका. इथे जाणे म्हणजे पैसावसूल आहे!

6. झांगजियाजी ग्रँड कॅनयन ग्लास ब्रिज (चीन):

ज्याचे तळ एक स्पष्ट काचेचे बनलेले आहे अशा या पुलावर चालण्याची हिम्मत कराल का? उत्तर होय असल्यास, आपण चीनमध्ये झांगजियाजी ग्रँड कॅनयन ग्लास ब्रिजला भेट द्यावी. जगातील सर्वात उंच आणि सर्वात लांब काचेचा तळ असलेला पूल अशी याची नोंद आहे. येथील काचेच्या तळातून ३६० मीटर खाली असणारे समृद्ध आणि विशाल जंगल आपणास पहावयास मिळेल. दुःखाची गोष्ट म्हणजे, या १,४१० फूट लांबीच्या पुलावर दररोज भेट देण्यास येणारया सुमारे ८० हजार पर्यटकांच्या झुंडीमुळे हा पूल बंद करण्यात आला आहे.

7. रॉयल गॉर्ज ब्रिज, यूएसए:

जमिनीवर शंभर फूट उभे असताना जर आपणास भोवळ येत नाही तर कोलोराडो येथील रॉयल गॉर्ज ब्रिज, यूएसए येथे आपण एकदातरी नक्कीच भेट द्या. २००१ पर्यंत तो जगातील सर्वात उंच पूल होता. प्रतिष्ठित रॉयल गॉर्ज ब्रिज हा अर्कॅन्सस नदीवरील १,२०० फूट लांब आणि ९५५ फूटपेक्षा जास्त उंच आहे. या पूलावरून आपण कॉलोराडो च्या आश्चर्यकारक नैसर्गिक सौंदर्याचे दृश्य पाहू शकता. २५ दशल्क्ष्य डॉलर चे हे आश्चर्य तुम्हाला अविस्मरणीय अनुभव देईल. आपण त्यास ओलांडण्याचा अनुभव नक्की घ्यावा.

8. पुएंट दे ओजुएला, मेक्सिको:

आपण एका अरुंद करकरणाऱ्या पुलावरून वाळवंटात एका भूत नगरीमध्ये चालत जाऊ शकाल का? मेक्सिकोमधील पुएंट दे ओजुएला ब्रिज खूप पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या एका शहराचे भितीदायक दृश्ये दाखवतो. लाकडाचे आधार म्हणून लावलेले दांडे, मोठ्या फळ्या हे तुम्हाला चालताना सुरक्षित करतात. हळू हळू हेलखावे खाणारा हा पूल आपला अनुभव आणखीनच थरारक बनवितो. अजून काय आहे? या भयानक पुलावरून पुढे सरकत असताना भितीदायक संरचना पाहताना उलट्या बाजूने येत असलेल्या पर्यटकांना जागा करून देताना आपली भीती अजूनच वाढेल. पुलावर पाय ठेवल्यानंतर ३६० चौ. फुटाच्या खाली असलेल्या खोऱ्याच्या भव्य दृश्यांसह आपले स्वागत होईल.

9. विटीम रिवर ब्रिज, रशिया:

सायबेरियातील विटिम रिवर ब्रिज वर उल्लेख केलेल्या पूलांपेक्षा वेगळा आहे, कारण ते पृष्ठभागाच्या अगदी जवळ आहे. हे पुल धोक्याचा आहे कारण तो एक जुना धातूचा ढाचा आहे, तसेच लाकडाच्या फळ्यांच्या ढिगाऱ्याने झाकलेला आहे. त्यावर बर्फाचा संचय झाल्यामुळे हा पूल अनेकदा निसरडा असतो. आम्ही तुम्हाला सांगितले का कि त्याला कठडा नाही ते! या पुलावरून सटकलात कि सरळ विटीम नदीत पडाल जी अतिशय थंड आहे. हे अंतर पार करा आणि आपण असे गर्वाने म्हणू शकता की आपण पृथ्वीवरील वरील सर्वात कठोर पूलांपैकी एकावर चालले आहात!

10. क्वेपोस ब्रिज, कोस्टा रिका (सीटीजी):

आम्ही आपल्याला ताकीद देत आहोत – कोस्टा रिका मधील क्वेपोस ब्रिजला ब्रिज ऑफ डेथ किंवा ओह माय गॉड ब्रिज असेही म्हणतात. विटिम रिवर ब्रिज प्रमाणेच ही संरचना पृष्ठभागाजवळ आहे. तथापि, हे अरुंद आहे आणि असे वाटते की ते अगदी थोड्याश्या दबावाने त्याचा चुरा होईल. ज्यावेळी या पुलावरून एखादे वाहन जाते त्यावेळी त्याच्यावरील फळ्या निसटतात आणि पुलाचा ढाचा हलायला लागतो. अशातच हा जुना पूल ओलांडत असताना प्रवाश्यांना त्रास होतो. आणि याचा शेवट कदाचित खाली नदीत पाण्यात पडून होतो. तेव्हा आता हा अडथळा पार करताना तुमच्या धाडसाची आणि एकाग्रतेची परीक्षा होणार हे नक्की!

जर आपण जमिनीपासून उंचीवर असाल आणि प्रत्येकवेळी उत्सुकता, धास्ती आणि आकर्षण आपल्याला आवडत असेल, तर आपण या पुलांचा अनुभव घेणे आवश्यकच आहे.

Share This