एखाद्या नैसर्गिक आश्चर्य किंवा मानवनिर्मित असलेल्या रचनेसह स्वत: ची छायाचित्रे सामायिक करण्यापेक्षा समाधानकारक आणखी काय असणार? जर आपण स्वत: ‘सेल्फी चे वेड’ असणार्यांमध्ये गणले जात असाल, तर हि आश्चर्यकारक ठिकाणे आपल्या अग्रसुचीत नक्कीच असली पाहिजेत. जी सेल्फीज आपण येथे काढाल, आम्ही हमी देतो की आपण या विलक्षण सेल्फीज शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकणार नाही.
उत्कृष्ट सेल्फी काढण्यासाठी आकर्षक ठिकाणांची यादी
1. ट्रोलतुंगा, नॉर्वे
नॉर्वेमधील ट्रोलतुंगा हे तुम्हाला सेल्फी काढण्यासाठी एक अतिशय विलक्षण ठिकाण आहे. मजेत गाणे म्हणणारी जीभ असा शब्दशः अर्थ असणारे, हे नैसर्गिक आश्चर्य म्हणजे पर्वतामधून बाहेर आलेला एक आडवा खडक होय. आपण जमिनीपासून ७०० मीटरपेक्षा अधिक उंचीवर रहाल, नयनरम्य रीन्गेदल्सवात्नेत सरोवर, फॉल्गेफॉआना हिमनदी आणि हारदान्गर विभागातील दऱ्या हे सर्व तुमच्या सेल्फिमध्ये येतीलच. ट्रोलतुंगाला पोहोचण्यासाठी आपल्याला १० ते १२ तास लागतात म्हणून सकाळी १० वाजण्यापूर्वीच त्याला सुरुवात करावी.
2. डेविल्स पूल, व्हिक्टोरिया फॉल्स, जिम्बाब्वे
झिम्बाब्वे मधील व्हिक्टोरिया फॉल्स मधील खडकाचा बनलेला डेविल्स पूल हे तुम्हाला अगदी काठावरचा थरार अनुभवायचा असल्यास, सेल्फी काढण्याचे एक उत्तम ठिकाण आहे. वर्षाच्या सुरवातीच्या काळात महिन्यात प्रवेश करता येण्याजोगा अंशतः पाण्याखाली गेलेला हा खडकाचा तुकडा तुमच्या आणि थेट खाली जाणारा १०० मीटर चा कडा यांच्यामधला दुवा होतो. फक्त पाण्यात उडी मारा आणि स्वत: फॉल्सच्या दिशेने वाहत जा. जेव्हा आपण कड्यापासून काही दूर अंतरावर असता तेव्हा झाम्बेझी नदीच्या ओसरलेल्या पाण्याजवळ हा खडक तुम्हाला थांबवेल. इथे फॉल्सच्या प्रवेशद्वारावर मार्गदर्शक नियुक्त करू शकता, जे या डेविल्स पूल जवळ आपली सुरक्षितता सुनिश्चित करतील.
3. यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान, यूएसए
आपण यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये कुठेही असाल, तरीही शेअर करण्यासारखे सेल्फिज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळतीलच. यलोस्टोन सरोवर येथे घेतलेल्या प्रतिमा आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना दाखवण्यासाठी उत्कृष्ट ठरू शकतात. यलोस्टोन पार्कमधील ग्रँड कॅनयन हे आणखी एक आकर्षण, ज्याला भेट देणे आपण गमावू शकत नाही. तुमच्या प्रत्येक सेल्फी मध्ये तुम्ही ३,४६८ मैलांवर पसरलेली अविश्वसनीय दृश्ये कैद करू शकता.
4. बाऊल्डर बीच, केप टाऊन, दक्षिण आफ्रिका
जर आपल्याला कुशीत घेण्यासारखे पेंग्विन आवडत असतील तर आपण केप टाऊन जवळ बाऊल्डर बीच, दक्षिण आफ्रिका इथे भेट देणे आवश्यक आहे. ३००० पेक्षा जास्त आफ्रिकन पेंग्विनने या शांत आणि सुरक्षित अशा येथील किनाऱ्यावर एक वसाहत वसवली आहे. काहीशा जिज्ञासू अशा या प्रेमळ पक्षांसोबत आपण अगदी उत्तम सेल्फिज नक्कीच काढू शकता.
5. प्लिटवाईस लेक्स नॅशनल पार्क, क्रोएशिया
प्लिटवाईस लेक्स नॅशनल पार्क क्रोएशियातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि दक्षिणपूर्व युरोपमधील सर्वात जुने आहे. हे उद्यान जगभरात त्याच्या १६ तलावांसाठी ओळखले जाते आणि ज्यात छोटे धबधबे नेहमी पाणी ओतत असतात. जवळच्या पर्वतांवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे इथे वर आणि खाली असे विभाग पडले आहेत. एखाद्या सेल्फिसाठी याहून परिपूर्ण स्थान कसे मिळणार? सूर्यप्रकाशाच्या कोनामुळे आणि पाण्यातल्या खनिज व प्राण्यांचे प्रमाणामुळे तलावाचे रंग हिरवा-आकाशी, निळा-करडा असे सतत बदलत राहतात.
6. माचू पिच्चू, पेरू
समुद्रसपाटीपासून २,४३० मीटर वर असलेल्या डोंगरावर वसलेले, १५ व्या शतकात पेरूमधील माचू पिच्चू येथील इंका किल्ला कुठल्याही जागतिक प्रवासाच्या यादीत असला पाहिजे. शिखरावर पोहोचण्यासाठी आपण २६ मैल इनकॅन ट्रेलचा प्रवास करणे आवश्यक आहे. हे अंतर जगातील सर्वोत्तम मानले जाते. रस्त्यामध्ये भेटणारे प्रेमळ लामा, ज्यामुळे तुमची छायाचित्रे आणि सेल्फिज खरोखरच संस्मरणीय होतील.
7. मलीग्ने लेक, कॅनडा
कॅनडाच्या जास्पर नॅशनल पार्कमध्ये स्थित असलेल्या मॅलिग्ने लेक हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ताज्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते. बोटीवर असताना, मालिग्ने लेकच्या मध्ये आपल्याला बर्फाच्छादित कॅनेडियन खडकांचे सुंदर आणि भव्य दृश्य पहावयास मिळेल. त्याच्या चित्तवेधक रंगासाठी प्रसिद्ध असणारे हे सरोवर स्पिरीट बेटाच्या अगदी जवळ आहे, जे जगातील सर्वाधिक फोटो काढले जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे.
8. सिन्क़्वे टेरे, इटली
आश्चर्यकारक सिन्क़्वे टेरेला इटलीचा एक खजिना मानले जाते. “पाच जमिनींचा संगम” म्हणून प्रसिद्ध असणारे, हे ठिकाण इटालियन रिविएरा येथे स्थित आहे म्हणूनच जगभरातील पर्यटक इथे वारंवार येतात. चढ-उताराचे भूप्रदेश आणि रंगीत पायऱ्या यांमुळे सिन्क़्वे टेरे हे छायाचित्र आणि सेल्फी काढण्यासाठी एक उत्तम स्थान बनते.
9. चित्तोडगड किल्ला, भारत
राजस्थानमधील चित्तोडगड किल्ल्यामध्ये चार राजवाडा संकुले, ४ स्मारक, १९ मुख्य मंदिरे आणि २० कार्यात्मक पाणीसाठे आहेत, अविश्वसनीय छायाचित्र आणि सेल्फिज काढण्याकरिता हे भारतातील सर्वोत्तम ठिकाण आहे. हा ७ व्या शतकातील किल्ला भारतातील सर्वात मोठा समजला जातो. अखेरीस निर्जन होण्यापूर्वी, इथे इतिहासातील बहुविध प्रतिष्ठित शासकांनी राज्य केले आहे. सुदैवाने, १९०५ मध्ये पुन्हा नव्याने नूतनीकरण करण्यात आले.
10. टोबोगन राइड मधून ग्रेट वॉल ऑफ चायना, चीन
चीनची ग्रेट वॉल भेट देण्यासाठी एक आश्चर्यकारक ठिकाणे आहे. जगाच्या या आश्चर्यकारक ठिकाणी टोबोगन राइड म्हणजेच एका घसरनाऱ्या छोट्या गाडीतून छायाचित्र किंवा सेल्फिज काढणे खरोखर संस्मरणीय ठरेल. स्लाइड करण्यासाठी आपण वापरलेल्या स्लाईड्स मध्ये एका वेळी दोन रायडर सामावू शकतात. आपल्या गुडघ्याच्या मधील लीव्हर पुढे ढकलून, ब्रेक सोडल्यावर टोबोगन राइड चालू होते आणि लीव्हर मागे ढकलल्यावर टोबोगन थांबते. जंगलातुन जवळजवळ १ मैल फिरल्याने आपल्याला अनेक सेल्फिज आणि व्हिडिओ काढण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी बराच वेळ मिळतो.
जगभरातील हि आश्चर्यकारक ठिकाणे सेल्फी काढण्यासाठी एक परिपूर्ण वातावरण प्रदान करते. आपण येथे काढलेल्या सेल्फिज अतिशय उत्तम असतील यात काही शंकाच नाही!
Related Post
मॉरिशसच्या हवामान बद्दल तुम्हाला माहित असण्यासारख्या आवश्यक गोष्टी
भटक्यांसाठीच बनलेली २० शहरे
युरोपमध्ये प्रवास करण्याची सर्वोत्तम आणि स्वस्त ठिकाणे
कृपया आपण थायलंडला वेगळ्या दृष्टीने पाहूयात का?
जगातील हि नितांतसुंदर स्थळे तुम्हाला नक्की विस्मयचकित करतील
इंस्टाग्राम वर सर्वात लोकप्रिय असलेली १० ठिकाणे