तुमच्या विशीत प्रवास करण्यासारख्या २० नाविन्यपूर्ण जागा:


Wednesday, February 28, 2018

प्रवास आता हळूहळू आपल्याला आवडणारा छंदच झाला आहे आणि तेही सर्व चांगल्या कारणासाठी! प्रवाश्यांची संख्या जशी वाढत आहे, नाविन्यपूर्ण जागा शोधणे तसे कठीणच आहे! काम, मुदती आणि तणाव यांना बाजुला सारून आपल्या गती आणि पर्यावरणामध्ये बदल करणे गरजेचे झाले आहे. या प्रकरणात नवीन आणि उत्साहपूर्ण दूरचे प्रवास अत्यंत आकर्षक वाटतात. हि संधी आम्ही तुम्हाला देत आहोत, झेप घ्या आणि नाविन्यपूर्ण देशांच्या प्रवासाला निघा. बोनस : हि ठिकाणे नाविन्यपूर्ण आहेत जेणेकरून आपण आपल्या डोळ्यांकरिता काहीतरी नवीन शोधू शकाल!

तसेच, कमी गर्दी आणि म्हणून जलद अन्नसेवा!

तुमच्या विशीत प्रवास करण्यासारख्या २० नाविन्यपूर्ण जागा खालीलप्रमाणे:

  • आयल ऑफ स्कि, स्कॉटलंड: स्कि म्हणजे उग्र पर्वत आणि फसफसणारी खाडी होय! इथे आपणास मनमोहक निसर्गदृश्ये, सुंदर आकाश आणि धुक्यात हरवलेली स्वप्नवत महाल पहावयास मिळतात.

  • काठमांडू, नेपाळ: काठमांडू म्हणजे मादक, अप्रतिम आणि थकवणारा! येथे आपण मध्ययुगीन मंदिरांना पाहून आश्चर्य करू शकता, ट्रेकिंग आणि बॅकपॅकिंग देखील करू शकता.

  • इलॅट, इस्त्राईल: इलॅट आनंद आणि विश्रांती घेण्यासाठी सर्वोत्तम स्थान आहे! लाल समुद्राच्या आकाशी-किरमीजी रंगाच्या पाण्यात स्नोर्क्लिंग, डायीविंग आणि पोहोण्याचा आनंद घेऊ शकता.

  • ब्रूमे, ऑस्ट्रेलिया: ब्रूमे नैसर्गिक चमत्कारांच्या मुकुटामध्ये एक रत्न आहे. साहसी, आलिशान आणि उत्तेजित करणाऱ्या गोष्टींचा आपण इथे आनंद घेऊ शकता.

  • मृत समुद्र, इस्राएल: पृथ्वीवरील सर्वात खालच्या बिंदूकडे फिरा. जिथे कुठलीही जैवविविधता अस्तित्वात नाही अशा ठिकाणी जाण्याचा आनंद घ्या.

  • हालोंग बे, व्हिएतनाम: हालोंग बे म्हणजे आकाशी-किरमिजी पाणी आणि सुंदर द्वीप! द्वीपकल्पासह चिन्हित, हलोंग एक अलौकिक सौंदर्य आहे आणि व्हिएतनाममधील उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण स्थानांपैकी एक आहे.

  • बेरूत, लेबनॉन: बेरूत म्हणजे सूर्य, समुद्र, वाळू आणि दृश्ये यांचे परिपूर्ण मिश्रण! आपण पूर्व आणि पश्चिम मिश्रणा बद्दल नेहमीच विचार केला असेल तर, बेरूत हे तेच ठिकाण आहे.

  • गॅलिपोली, टर्की: युरोपियन रचनेच्या तराफ्यामध्ये, गॅलिपोली हे तुर्कीच्या लहान वसाहतीमधील सर्वात सुंदर स्थान आहे.

  • व्हिक्टोरिया फॉल्स, आफ्रिका: व्हिक्टोरिया फॉल्स हे आफ्रिकेच्या मूळ प्रभावी स्थानांपैकी एक आहे. पृथ्वीवरच्या सर्वात मोठ्या देखाव्याला पाहण्याची संधी आपल्या विशीत एकदातरी अनुभवाच.

  • टरक्वाइज लगून, बोरा बोरा: सफर करण्यासाठी या खाऱ्या पाण्याच्या सरोवराची निवड करा आणि ब्लॅक टीप रीफ शार्क ला जवळून पाहण्याची संधी अनुभवा. स्फटीकासारख्या स्वछ पाण्यासोबत इथली जादू अनुभवा!

  • गोल्डन बे, न्यूझीलंड: ग्रामीण मोहिनी, कलात्मक वैभव, पर्यायी जीवनशैली आणि चंचल लोक हे गोल्डन बे येथील सौंदर्य आहे!

  • प्रेमाचा बोगदा, क्लेवन, युक्रेन: चार किलोमीटर अंतराचा झाडांमधून जाणारा एक पुरातन नैसर्गिक बोगदा आहे. असे म्हटले जाते कि प्रेमी अभ्यागतांच्या मागण्या पूर्ण होतात. तुम्हीदेखील प्रयत्न करून पहा!

  • जगाच्या अंती झोके घ्या, बॅनोस, इक्वेडोर: ‘एंड ऑफ दी वर्ल्ड’ येथे झोके घेऊन प्रत्येक प्रवाश्याचे स्वप्न सत्यात उतरते. कासा डेल आर्बोल या वृक्षामध्ये बनवलेल्या घरामधून लटकवलेल्या लांब दोरीमधून उंचच उंच झोके घेता येतात. हा आपल्या आयुष्यातील सर्वात उंच झोका असू शकतो!

  • फ्रीटाऊन ख्रिस्तीयानिया, डेन्मार्क: अर्धा देश हा सुंदर अशी स्वतः बनवलेली घरे, उबदार बगिचे, हस्तकलेची दुकाने, भोजनालये, बिअर गार्डन्स आणि संगीत यांचा फ्रीटाऊन ख्रिस्तीयानिया हा अद्भुत प्रदेश आहे.

  • अटाकामा डेझर्ट, चिली: रंगीत खडक, अवाढव्य, खडकाळ पांढरया मिठासारखे दगड आणि क्षितिजावर अग्रमानांकित ज्वालामुखी हे अटाकामा वाळवंटाचे सार आहे. हे वाळवंट त्याच्या मूळ सौंदर्याने आपल्याला उत्साहित आणि चकित करते.

  • हॉबिट व्हिलेज, न्यूझीलंड: चित्रपट हीच आपली दुनिया आहे का? चित्रपटसृष्टीत जाण्याची आपली संधी येथे आहे! न्यूझीलंडच्या ह्रदयामध्ये, आपण परगाण्यातील हिरव्या कुरणावर पाऊल टाकू शकता. अगदी लॉर्ड ऑफ द रिंग्स व होबिट ट्राइलाँजी मध्ये दाखवल्याप्रमाणे!

  • इटालियन बेटे, लेवेनाझो, सिसिली: भूमध्य समुद्रातील निळसर हिरव्या पाण्याची वेढलेली, नैसर्गिक सौंदर्याच्या मोहिनीसह, लेवेनाझो बेट सिसीलीतील सर्वात सुंदर बेट आहे.

  • द युकॉन, कॅनडा: भव्यता आणि सौंदर्य जे आपण अन्यत्र शोधू शकणार नाही. हे निर्दोष आश्चर्य आपल्याला स्वत:ची अधिक कदर करायला लावेल!

  • अँकरेज, अलास्का: अँकरेज म्हणजे जंगलाचे कडे आहे! तेव्हा इथे साहसासाठी सज्ज व्हा!

 

  • तमन नेगारा नॅशनल पार्क, मलेशिया: जर तुम्ही वर्षावने व बाह्य उपक्रमाचे चाहते असाल तर तमन नेगारा नॅशनल पार्क हे तेच ठिकाण आहे! जंगल ट्रेकिंग, पर्वतारोहण, केव्हिंग, मासेमारी, कॅम्पिंग आणि वन्यजीवाचे निरीक्षण यांचा आपण येथे आनंद उपभोगु शकता.

हे २० मनोरंजक व आनंददायक ठिकाणे आपली खुल्या मनाने वाट पाहत आहेत. आपल्या विशीचा आनंद अनुभवा! आणि इथून इतके अनुभव घ्या कि ते ऐकताना पारंपारिक जागांवर जाणारा तुमचा मित्रवर्ग नक्कीच मत्सरीत होईल.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

*
*