Travel Blog by Thomas Cook India

कृपया आपण थायलंडला वेगळ्या दृष्टीने पाहूयात का?

कधी कधी जी गोष्ट डोळ्यांना दिसते कदाचित त्यापेक्षाही ती अधिक मोठी असू शकते. होय, आपण एखाद्या ठिकाणाविषयी जे काही ऐकतो त्यापेक्षाही ते नेहमी अधिकच असते. पण दुर्दैवाने, सुंदर अशी ‘प्रसन्न भूमी’ थायलंड हि सर्व भारतीयांसाठी धाडसी कारणांमुळे लोकप्रिय आहे. इतर कोणत्याही देशाप्रमाणे,थायलंडसमोर त्याचे स्वता:चे ठळक मुद्दे आणि आव्हाने आहेत. म्हणून आपण पक्षघात करू नये आणि गडद काळ्या बाजूला केंद्रित करू नये. कारण थायलंडसाठी आपल्याला जे काही वाटतं त्यापेक्षा त्याच्याकडे बरेच काही आहे. त्याची बेटे आणि किनार्यांवरील सौंदर्य खरोखरच चित्तथरारक आहे. आणि स्थानिक संस्कृती म्हणजे आपल्याला अनुभव घ्यायला आवडेल असे काहीतरी आहे.

थायलंड सामान्यतः स्वादिष्ट अन्न, थाई मालिश आणि स्पा, शॉपिंग, भव्य हॉटेलांकरिता प्रसिद्ध आणि त्यात हे परवडण्यासारखे असल्यामुळे इथे भेट दिली जाते. पण, एक अज्ञात, थायलंडचे अलिखित सौंदर्य स्वतःला शोधून काढण्यासाठी आणि इतरांनी तो अनुभव घेण्याची प्रतीक्षा करीत आहे. आपण थायलंड पर्यटनाची सुंदरता एका वेगळ्या प्रकारे अनुभवण्यासाठी तयार आहात का? तेव्हा स्वताला तयार करा! थायलंड मध्ये अनुभवण्यासारखी  ठिकाणांची सूची येथे आहे:

थायलंड मधली हि ठिकाणे ज्यांना भेट देणे आवश्यक आहे:

1. धबधब्याच्या स्वर्ग चांताभूरी :

थायलंडच्या पूर्वेकडील भागात लपलेले, चांताभूरी प्रदेश एक धबधब्याचा स्वर्गच आहे. तळी, नद्या आणि वर्षावने यांनी झाकलेले तसेच येथे नाम्तोक फिलो हे राष्ट्रीय उद्यान एक उत्तम हायकिंगचा अनुभव देते. आपण येथे स्थानिक लोकांसोबत येथील स्थानिक जेवणाचा आनंद घेऊ शकता. आपल्या भेटीदरम्यान, बहुतेक मंदिरे आणि पगोडासची अपेक्षा करा आणि अद्भुत कॅथोलिक मध्यांतराचे साक्षीदार व्हा.

2. दुचाकीवर अनुभवा म्यानमारची सीमा :

म्यानमार सीमेवर जाणारा ओबडधाबड रस्त्यावर दुचाकीवरून फिरण्याचा अनुभव घ्या. आणि थायलंडची  आल्हाददायक मूळ सौंदर्याची खुमारी अनुभवा. वादळी पर्वतामधून रस्त्यांवर वाहन चालवणे हा एक रोमांचकारी अनुभव आहे जो आपण आधी कधीच अनुभवला नाही. येथील नैसर्गिक दृशे मनमोहक आणि सीमेवरचे दृश्य आनंददायी आहे!

3. चिआंग राय येथील माउंटेन बाइकची सफर :

स्वतःतील पर्यटकाला जागे करा आणि माउंटेन बाइकवरून चिआंग राय व आजूबाजूच्या परिसराच्या सफरीला निघा! खूप काही सांगणारे रस्ते आणि शांत शेतजमिनी यांचा आनंद घ्या. सफारीचा आनंद लुटण्याचा हा सर्वात वेगळा मार्ग आहे, बरोबर?

4. लंपांग येथे हत्तीना भेटा :

हि शांत नगरी, तेथील नदीकिनारे, अतिथीगृहे, घोड्यांचे रेखांकित रथ आणि कौतुक करण्यासारखी बौद्ध मंदिरे यांमुळे नक्कीच भेट देण्यासारखी आहे. फक्त इतकेच नाही तर लंपांग हे थायलंडचे हत्ती संरक्षण व संवर्धन केंद्र आहे. जिथे तुम्ही ५० पेक्षाही अधिक हत्ती आणि त्यांच्या पिल्लांसोबत उत्तम वेळ घालवू शकता.

5. राऐले येथे रॉक क्लाइम्ब :

हे ठिकाण साहस प्रेमींसाठी आहे! राऐले येथे क्लाइंबिंग एक सुंदर अनुभव आहे आणि क्लाइंबिंगसाठी लागणारी विस्मयकारक नैसार्गिक वातावरण आपल्याला जगात कुठेही सापडणार नाही. सभोवतालची क्रास्त बेटे श्वास रोखून धरणारी आहेत. हि संधी गमावू नका!

6. किक बॉक्सिंग शिका :

असे म्हणतात कि जेव्हा आपण एखाद्या ठिकाणास भेट देता, तेव्हा त्यांच्या संस्कृतीला जाणून घ्या आणि त्यांच्या संस्कृतीचा एक भाग व्हा. तर, आपण थायलंडमध्ये असताना थोडा वेळ काढा आणि किकबॉक्सिंग ज्याला ‘मूय थाई’ म्हणतात ते नक्की शिकाच.

7. सोंगक्रान मध्ये सहभागी व्हा :

जर तुम्ही सोंगक्रान फेस्टिवल दरम्यान आपल्या थायलंड दौरा पॅकेज बुक केला तर त्यात नक्की सहभागी व्हा. थाई नववर्ष साजरा करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या वॉटर फाईटचा अनुभव गमावू नका.

8. धबधब्यांची भूमी, पेट्चबुन :

उत्तर थायलंड मध्ये स्थित, पेट्चबुन हि धबधब्यांची भूमी आहे. हा परिसर पर्वत रांगा, नद्या आणि राष्ट्रीय उद्याने यांनी व्यापलेला आहे. येथील सौंदर्य अत्याधुनिक आणि अविस्मरणीय आहे. येथे, आपण खरोखर वेगळ्या प्रकारे थायलंडचा अनुभव घ्याल!

9. बुरीयम येथील अवशेष :

जे लोक ऐतिहासिक वस्तू आणि त्यांचे अवशेष यांवर प्रेम करतात त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे स्वप्न सत्यात येण्यासारखेच आहे! दक्षिण पूर्व आशियातील सर्वात संरक्षित खमेर मंदिरांपैकी फॅनोम रंग येथे नक्की भेट द्या.

आपण खरंच जर खऱ्याखुऱ्या थाईलंडचा जिवंत अनुभव इच्छित असल्यास, कधीही न अनुभवलेल्या मार्गांच्या या सूचीचे अनुसरण करा. तेव्हा जरा थांबा, स्वतःला प्रत्येक क्षणात भिजवून घ्या आणि आपल्या ‘ऑफबेट थायलंड’ च्या कथा सांगा. थायलंडमध्ये आपल्याला देण्यासाठी बरेच अनुभव आहेत आणि आमच्या थायलंड होलीडे पॅकेजेसमध्ये आपल्यासाठी भरपूर काही आहे.

Share This