राजस्थान अनेक वर्षांपासून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. आधुनिकीकरण असूनही हे एक असे राज्य आहे जे त्याच्या संस्कृतीचा गर्व करते. सौंदर्य आणि त्यांच्या आदरातिथ्य व्यतिरिक्त, राजस्थानाला भेट देण्याचे हे अजून एक कारण आहे. जेव्हा आम्ही हे म्हणतो, तेव्हा याचा अर्थ केवळ भेट द्या असा होत नाही तर राजस्थानचा अनुभव घ्या असा होतो. आणि तेथील कार्यक्रम आणि उत्सव साजरा करण्याची संधी गमावू नका. ते प्रत्येक क्षणाला आपल्याला एक नवीन अनुभूती देतात.
1. गंगूर फेस्टिवल:
भगवान शिवशंकर यांच्या पत्नी देवी पार्वती या सद्गुण आणि भक्तीचं प्रतिक असून विवाहित महिलांसाठी कल्पित व्यक्तिमत्व मानल्या जातात. त्यांच्या सन्मानार्थ गंगूर उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव मुख्यत्वे उदयपूर, जयपूर आणि मांडवा येथे मार्च किंवा एप्रिल मध्ये साजरा केला जातो. महिला आणि तरुण मुली पारंपारीक वस्त्र जसे कि लेहेंगा किंवा चनिया चोळी परिधान करून गाण्यातून आणि नृत्यातून भगवान शंकर आणि देवी पार्वतीची आराधना करतात. तरुण मुली इच्छित वर प्राप्तीसाठी प्रार्थना करतात तर विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या संरक्षणासाठी प्रार्थना करतात. या उत्सवात भगवान शंकर आपल्या वधूला घरी घेऊन जाण्यास निघाले आहेत असा आशय प्रकट करणाऱ्या मिरवणुका निघतात. हा उत्सव होळी नंतर जवळपास दोन आठवडे चालतो.
2. मेवार फेस्टिवल :
मेवार उत्सव हा वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी मोठ्या उत्साहात आणि सजावटीने उदयपुर मध्ये साजरा केला जातो. या उत्सवात संपूर्ण उदयपुर आनंदोत्सवात न्हावून निघते. गंगूर उत्सवासारखाच मेवारचा उत्सव राजस्थानातील महिलांसाठी तितकाच महत्वाचा आहे. सर्व महिला भगवान शंकर आणि पार्वती यांच्या प्रतिमा तयार करण्यासाठी एकत्र येतात. त्यानंतर या प्रतिमांना घेऊन शहराच्या विविध भागांतून निघणाऱ्या पारंपारिक मिरवणुकामध्ये सहभागी होतात. सर्वात शेवटी या मिरवणुका पिचोला सरोवरस्थित गंगूर घाटाकडे येतात. यावेळी या प्रतिमा विशेष नौकांमध्ये रवाना करून सरोवराच्या खोल पाण्यामध्ये विसर्जित केल्या जातात.
3. जोधपुर डेजर्ट फेस्टिवल :
जोधपुर डेजर्ट महोत्सव हा जानेवारी मध्ये साजरा केला जातो. जैसलमेर पासून २४ किलोमीटर अंतरावर असलेल्या सॅम सॅंड ड्यून येथे हा महोत्सव साजरा करतात. सर्व राजस्थान मधून आलेले उंट इथे जमतात आणि श्वास रोखून धरणारे प्रात्यक्षिक करतात. हा उत्सव तीन दिवस शांततेत आणि भव्यतेने साजरा केला जातो. हा महोत्सव म्हणजे समृद्ध सांस्कृतिक कला, पारंपारिक गायन आणि नृत्य यांसाठी एक व्यासपीठ आहे. या उत्सवाच्या प्रमुख आकर्षणामध्ये उंटांच्या शर्यती, बाहुल्यांचे खेळ, गेअर अॅंड फायर डांस, पगडी बांधने स्पर्धा, मिस्टर डेजर्ट स्पर्धा, टग-ऑफ-वॅार आणि बरेच काही समाविष्ट असते. जसा अंधार पडत जातो तसे सॅंड ड्यून मध्ये राजा, सैनिक, त्यांचे सोबती यांच्या बद्दलची भावनात्मक गाणी आणि महाकाव्यांवरील कठपुतल्यांचे नाट्यरूपी खेळ अधिक रंगत येत जातात. या गोष्टींचा अनुभव घेणे हे राजस्थान मध्ये आल्यावर जणू आवश्यकच आहे.
4. पुष्कर फेयर :
पुष्करचा हा महोत्सव जगप्रसिद्ध असून तो नोव्हेंबरमध्ये साजरा केला जातो. या काळामध्ये पुष्कर हे एका भव्य मैदानामध्ये परावर्तित होते. हजारो भाविक पुष्कर सरोवरात स्नान करण्यासाठी आणि ब्रम्हा मंदिरात दर्शन घेण्यासाठी इथे भेट देतात. पुष्कर मेळाव्यात सर्वात मोठा गाई-गुरे आणि उंटांचा बाजार भरतो. जिथे उत्पादक, शेतकरी आणि व्यापारी खरेदी-विक्री साठी येतात. यावेळी सर्व पुष्कर एकत्र येतात आणि लोकगीत, नृत्य, शेकोटी यांच्या माध्यमातून एकमेकांचे मनोरंजन करतात. पुष्कर मेळावा हा राजस्थान पर्यटनाचा अभिमान आहे.
5. मारवाड फेस्टिवल :
मारवाड महोत्सव मारवाड प्रांतातील नृत्य आणि संगीताला समर्पित आहे. हा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये जोधपूर शहरामध्ये साजरा केला जातो. हे खरोखर जोधपूरची कला आणि संस्कृती प्रतिबिंबित करते. तसेच मांड महोत्सव हा या महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
6. तिज सेलेब्रेशन्स :
ऑगस्ट महिन्यात मान्सूनच्या हंगामाच्या सुरुवातीला तिज साजरा केला जातो. संपूर्ण राज्यात विशेषतः जयपूर मध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यामध्ये देवी पार्वतीच्या मूर्तीची नृत्य आणि संगीतासह दोन दिवस मिरवणूक काढली जाते.
7. जयपूर थिएटर फेस्टिवल – जयरंगम्:
‘जयरंगम्’ हे जयपूर मध्ये होणारा वार्षिक राष्ट्रीय थिएटर फेस्टिवल आहे. सलग एक आठवडा असलेल्या या महोत्सवात संपूर्ण भारतातील मुख्य कलाकृती प्रदर्शित केल्या जातात. थिएटर विश्वातील नावलौकिक असणारे कलाकार जयपूरला आपल्या सर्वोत्कृष्ट नाटकांना सादर करण्यासाठी येतात. हे प्रत्येक महत्वाकांक्षी थिएटर कलाकारासाठी नंदनवन आहे.
8. द समर फेस्टिवल :
राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन असलेल्या माउंट अबू इथे हा उन्हाळी उत्सव साजरा केला जातो. जून महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हा एकमेव उत्सव असतो. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत आणि संगीत या परिसरातील भिल् जमातीं करतात. हा सण शहरात आनंदाचे वातावरण आणतो जेणेकरून पर्यटक माउंट अबूच्या भेटीसाठी कायम येत राहतील.
आपण राजस्थानला फ़क़्त भेट देत नाही तर राजस्थान अनुभवतो! हे ८ अपवादात्मक उत्सव आहेत. हे ८ अपरिवर्तनीय उत्सव आहेत जे साजरा करण्याची संधी तुम्ही चुकवू शकत नाहीत! म्हणून राजस्थानाच्या आपल्या पुढच्या प्रवासाची योजना करा आणि उत्सव, कला आणि संस्कृतीच्या रंगात मंत्रमुग्ध व्हा.