प्रदूषण, प्रदूषण सर्वत्र प्रदूषण, श्वास घेण्यासाठी सुद्धा शुद्ध हवा नाही. दिवांसोदिवस आपले जीवन कठीणच होत चालले आहे. तुम्हाला असे नाही वाटत या पेक्षा अधिक मिळवण्यासाठी आपण पात्र आहोत? आपल्याला ते मिळालं पाहिजे, नाही का? ते इंद्रधनुंचे दृश्य, तो सुसाट वाऱ्याचा आवाज आणखी भरपूर काही, तर या उन्हाळ्यात तुम्ही काय करत आहात? चला तर ‘वसुंधरा दिनाच्या’ निमित्ताने आपण जगातील पर्यावरण पूरक स्थळांना भेटी देऊन, आपण तो साजरा करूयात.
जगातील १० सर्वोत्तम पर्यावरण पूरक स्थळांची यादी खालील प्रमाणे
1. भूतान:
भूतान आपल्या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, त्यांचे संरक्षण आणि त्यांना सांभाळण्याच्या दृष्टीने आपल्या पर्यटनाचा विकास करत आहे. सर्वोत्तम पर्यावरण पूरक प्रवास ठिकाणांपैकी हे एक नाही का?
2. न्यूझीलंड:
न्यूझीलंड हे घर आहे निरनिराळ्या वनस्पतींचे, वेगवेगळ्या वन्यजीवांचे. न्यूझीलंड हे पर्यटनातील एक उत्तम ठिकाण आहे, हे आपल्या आलीशान पर्यावरण पूरक पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. इथे निसर्गाला इजा पोहोचवणे हे अगदीच त्यांचा धर्मा विरुद्ध आहे.
3. कोस्टा रिका:
२०२१ पर्यंत कोस्टा रिका हा जगातला पहिला कार्बन तटस्थ देश बनण्याच्या मार्गावर आहे. येथे आपल्याला फ्लोरा आणि फौना ची विभिन्नता असेलेली जैवविविधता पाहायला मिळेल. आणि याच ठिकाणी तुम्ही निरभ्र आकाश पाहू शकता, आणि आपल्या गण्या मार्फत तुम्ही ताऱ्यांना विचारू शकता ‘तुम्ही माझ्यासाठी तर प्रकाशमान नाही ना होत आहात?’
4. अलास्का:
जर तुम्हाला निसर्गाचा एक ‘रुक्ष’ अनुभव घ्यायचा असेल तर अलास्का जगातल्या खऱ्या रुक्षवन्य ठिकाणांपैकी एक आहे. आपण येथे हिमनद्या पाहू शकता, कायाकिंगचा देखील अनुभव घेऊ शकता, येथील आश्चर्यकारक वन्यजीवन तुम्हाला भुरळ घालेल, येथे मासे पकडण्या सोबतच तुम्ही डेनाली नॅशनल पार्कचा देखील आनंद घेऊ शकता. हा एक पर्यावरण पूरक असा दौरा आहे ज्याला तुम्ही नाकारू नाही शकत.
5. सांताक्रूझ बेट, कॅलिफोर्निया:
सांताक्रूझ बेट याने खऱ्या अर्थाने निसर्गाच्या बाहुंमध्ये आश्रय घेतला आहे. पण एक गोष्ट इथे तुम्ही लक्षात घ्यायला हवी कि हे कुठले मनुष्य विरुद्ध जंगल नव्हे! हे बेट दोन खडकाळ भागात विभागलेले गेले आहे, एक मध्यवर्ती दरी ज्यात वर्षभर वाहणारे झरे, प्रवाह, महाकाय सागरी लेणी आणि प्रशस्त बेटे आहे.
6. अॅमेझॉन रेनफॉरेस्ट, ब्राझील:
वर्षावानातील जलपर्यटनासाठी तयार राहा जिथे तुम्हाला ८०,००० पेक्षा हि अधिक वनस्पती प्रजाती, ३० दशलक्ष प्राण्यांच्या प्रजाती पाहायला मिळतील. इथे तुम्हाला गुलाबी व करड्या रंगाची नदीत राहणारी डॉल्फिन पाहायला मिळतील. इथे आपल्या मुक्त इच्छांचा आनंद घ्या!
7. डोमिनिका:
डोमिनिका हे निसर्गावर अधिक प्रेम करणार्यांसाठी, ट्वीचर्स साठी, हायकर्स साठी आणि डायवर्स साठी प्रसिद्ध आहे. तुम्ही स्वतःत उत्तम असाल अथवा नसाल पण येथील निसर्ग हा सर्वोत्तम आहे.
8. केनिया:
केनियातील चित्तथरारक सवाना आपल्या उदात्त वन्य प्राण्यांसोबत आपली वाट पाहत आहे. हे स्वर्ग आहे ज्याला कुठले पूर्वमस्तिष्क नाही आहे फक्त ते पुष्पांचे मुकुट.
9. नॉर्वे:
नॉर्वेमध्ये आपल्याला सुंदर ५ पर्यावरण पूरक आकर्षणे पाहायला मिळतात हार्डनजर्फजॉर्ड, जोटूनहॅमन पर्वत, जॅरेनची बेटे, सॉल्टस्ट्रुमेन आणि फिन मार्क मधील डॉग स्लेडिंग. जे तुम्हाला करता येत नाही ते नॉर्वे मध्ये करा.
10. मालदीव:
मालदीव तुम्हाला आपल्या पर्यटनात प्राचीन बेटे, आकर्षक पोवळ्याचे खडक, शुद्ध ताजे पाणी देऊ करते.
एकंदरच चर्चेत राहणाऱ्या गोष्टींमध्ये व्यस्त असताना एकदा तरी पर्यावरण पूरक पथावर येऊन पहा, निसर्गाचे मित्र व्हा याच्या कणा-कणांचे मित्र व्हा!