प्रत्येक गोष्ट जी केरळ बॅकवॉटर मधील बोटींविषयी आपल्याला माहित असायला हवी


Friday, March 2, 2018

जेव्हा स्वतः देवाची नगरी तुम्हाला बोलावते तेव्हा नाही म्हणू नका. कारण केरळने त्याच्या विलक्षण नैसर्गिक

सौंदर्याचा जणू मुकुटच घातलेला आहे. केरळमधील बॅकवॉटरसाठी असलेल्या अद्वितीय हाउसबोट्स जगभरातील अनेकांसाठी आकर्षणे ठरल्या आहेत. या आश्चर्यकारक पर्यावरणातील आपल्या सफरीची योजना करण्यापूर्वी आपल्याला आवश्यक असलेली काही माहिती येथे आहे.

केरळच्या बॅकवॉटरमध्ये हाउसबोट्सच का?

भारतातील सर्वात आकर्षक राज्यातील एक हे त्याच्या योग्यतेप्रमाणेच एक अतिशय आकर्षक ठिकाणासाठी पात्र आहे.

बॅकवॉटर हे त्यामधीलच एक आहे. केरळचे बॅकवॉटर ९०० किमीचा नागमोडी जलमार्ग आहे. ज्यात एकमेकांना जोडल्या गेलेल्या नलिका, नद्या, सरोवर यांचे जाळेच आहे. याच्या मध्यभागी गावे आणि शहरे आहेत जे बॅकवॉटर प्रवासाचा प्रारंभ आणि शेवटचा बिंदू म्हणून सेवा करत आहे. बॅकवॉटर पर्यावरणातील विलक्षण भाग म्हणजे नद्यांमधून गोड पाणी अरबी समुद्राच्या पात्राशी एकत्र येते. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा नदीच्या ताज्या पाण्यात शिरकाव होऊ नये म्हणून कुमाराकॉमजवळील वंबनाद कयाल सारख्या काही भागात धरणे बांधलेली आहेत. या बॅकवॉटरच्या आत आणि बाजूला जलीय जीवनाच्या अनेक प्रजाती आहेत जसे कि मासे, खेकडे, बेडूक, मडस्कीपर आणि पाण्याचे पक्षी जसे की टोकदार चोच आणि काळे-पांढरे पंख असणारा एक सागरी पक्षी टर्न, पानकावळे, लांब बारीक मान व चोच असणारा पाणवठ्याजवळचा एक पक्षी डार्तर, कानढोक पक्षी तसेच पाणमांजर व कासवे असे प्राणी आढळतात. केरळचे बॅकवॉटर शांती, चैतन्य आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ठामपणे ओळखले जाते.

केरळमधील बॅकवॉटरना भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ

केरळचे बॅकवॉटर वर्षाच्या कोणत्याही वेळी कौटुंबिक भेटीसाठी आदर्श आहेत. या परिवर्तनशीलतेमुळेच एक आवडते ठिकाण असण्याचे एक कारण आहे. जर आपणास या ठिकाणाची शांतता अनुभवायची असेल तर ऑगस्ट आणि मे मधील दरम्यानच्या प्रवासाची योजना करा, म्हणजे आपण मान्सून टाळा आणि शांत आणि स्थिरचित्ताने इथला   जास्तीत जास्त आनंद घेऊ शकाल.

अलप्पी बॅकवॉटर हाउसबोटची सफर

आपण बॅकवॉटर विचार करता तेव्हा, मनात येणारे पहिले नाव अलप्पी आहे. अलप्पी बॅकवॉटर, हे लोकप्रियपणे पूर्वेकडील वेनिस म्हणून ओळखले जाते. तसेच बॅकवॉटरसाठी हे एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. नैसर्गिक तलाव, खारफुटी, आणि गोड्या पाण्यातील नद्या यातून होणारी हाउसबोटची सफर बॅकवॉटर्सचा आनंद कसा घेता येईल या गोंधळाच्या समस्येचे उत्तर ठरेल. या संपूर्ण प्रकरणातील उत्तम भाग म्हणजे केरळमधील हाऊसबोटवरील अस्सल स्थानिक जेवण म्हणजे लज्जतदार मासे! अर्थात, आपण आपल्या चवीनुसार आणि आवडीनुसार त्यांना सानुकूलित करू शकता मात्र परंतु रोममध्ये असताना …! कारण रोमन लोक तसे खातात म्हणून तुम्हीही खा. अल्लपी येथील बॅकवॉटरमध्ये सफर करणे हे केरळधील अवश्य करण्यासारख्या गोष्टींपैकी एक आहे.

केरळमधील होऊसबोट्सचे विभाग आणि प्रकार

केरळमधील हाउसबोट इको-फ्रेंडली सामुग्रीने बनलेले आहेत आणि दिवसा प्रवास किंवा रात्री मुक्कामसाठी भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी बहुतांश बोटींवर नारळाच्या पानांपासून बनलेले गवताचे छप्पर आहे. जरी बाह्य स्वरूप नैसर्गिक आणि सेंद्रिय घटकांपासून बनले असले तरी इथे उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा बऱ्याच आधुनिक आहेत जणू काही एखाद्या आरामदायक हॉटेल प्रमाणे! हे हाउसबोट वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पूर्णतः सुसज्ज बेडरूम देतात. जर तुम्हाला बाहेरचे सौंदर्य निरस वाटलेच तर दूरदर्शनसंचसह विशिष्ठ विश्रामगृह देखील आहेत मात्र त्याची फारच कमी वेळा गरज पडते. या सर्व हाउसबोट्समध्ये आवश्यक सुरक्षा उपाय आहेत आणि ते केरळ सरकार आणि पर्यटन विभागाच्या अनुसार आहेत.

केरळमधील तीन मुख्य प्रकारचे हाउसबोट्स आहेत

  • स्टँडर्ड हाउसबोट्स: ही मूलभूत नौका आहेत ज्यात फक्त आवश्यक सुविधा आहेत
  • डिलक्स / प्रिमियम हाउसबोट्स: स्टँडर्ड हाउसबोट्सच्या तुलनेत यामध्ये काही अधिक सुखसोयी आहेत, जसे की रात्री 10 तास वातानुकूलित सेवा आहे
  • लक्झरी / सुपर डिलक्स हाउसबोट्स: या हाउसबोट्स सर्वात उच्च प्रतीच्या आहेत. इथे २४-तास वातानुकूलन सेवा आणि गणवेशधारी कर्मचारीदेखील आहे

प्रत्येक मनाचा कल आणि वयानुसार सुशोभित केलेल्या केरळमधील या हाउसबोट्सची रचना तुमची निसर्ग आणि सौंदर्य यांची आवड लक्षात घेऊनच केली आहे.

केरळच्या बॅकवॉटर सफारीचा आनंद घेण्यासाठी, आपली सुट्टी संस्मरणीय करण्यासाठी आमच्या सर्वोत्तम

केरळ हॉलीडे पॅकेजची निवड करा.

Share This