कधीही न संपणारे काम, दबावपूर्ण डेडलाईन, खूप काळ चालणाऱ्या मिटींग्स आणि पर्वताएवढा तणाव हे थोडक्यात आपल्या जीवनाचा भागच आहे. शहराच्या या मोहिनीने आपल्या आयुष्याला तिच्या आकर्षणाने वेढले आहे आणि आम्ही त्यात गुंतलो आहोत. या सर्वाना थोडा विराम द्या आणि या उन्हाळ्यात निसर्गाच्या कुशीत सुंदरतेचा अनुभव घ्या. जंगलातील जीवन अनुभवा. खालील दिलेल्या जंगलातील वन्यजीव रिसॉर्टमध्ये अगदी राजासारखे राहा:
1. बंगाल वाघांच्या विशाल आणि सुखदायक गर्जना:
राजस्थानमधील रणथंबोरमध्ये अमन-ए-खास रिसॉर्ट भव्य तंबुंचे बनलेले आहे. येथे आपण एक शेकोटीच्या समोर आराम करू शकता आणि आपण बंगालच्या वाघांच्या गर्जना ऐकत असतांना रोमांचित होऊ शकता. हे रिसॉर्ट म्हणजे निसर्गाच्या हिरव्यागार हृदयात प्रवेश करण्याचा जणू एक मार्गच आहे. तेव्हा उन्हाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी आमच्या राजस्थान हॉलीडे पॅकेजचा लाभ घ्या.
2. मृदू-शांत जंगले:
शांततापूर्ण वन्यजीवन अनुभवण्यासाठी निसर्गाच्या कुशीत वसलेले मॅनलँड जंगल लॉज, गिर, गुजरात हे उत्तम ठिकाण आहे. सौंदर्याचा स्पर्श झालेल्या या जंगलाचा अनुभव नक्कीच घ्या. या रिसॉर्ट मध्ये वन्यजीवसृष्टीच्या सर्वोत्तम दृश्यांचा आनंद इथे आपण एका राजाप्रमाणे घेऊ शकता!
3. शाखांच्या अगदी जवळ:
ताज बागवान जंगल लॉज, पेंच राष्ट्रीय उद्यान, मध्यप्रदेश भारतातील एक अद्वितीय वन्यजीव रिसॉर्ट आहेत. खुल्या छपरातून, आपणास पक्षी आणि माकडांचे जवळचे दृश्य दाखवतात. एवढेच नाही, पेंच राष्ट्रीय उद्यान इथून फक्त पाच मिनिटे दूर आहे.
4. सफारीचा अनुभव:
सुंदरबन मँग्रोव रिट्रीट, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, हे पश्चिम बंगालमध्ये एक वन्यजीव रिसॉर्ट आहे ज्यामध्ये आपण बंगालच्या वाघांना पाहू शकता. हे गोमोर नदीत मासेमारीची आणि सुंदरबनच्या घनदाट जंगलातील सफारीची संधी देते. तसेच येथे आपण ‘बोनोबिबी यात्रा’ चा आनंद घेऊ शकता जिथे २० लोकांचा समूह त्यांच्या आदिवासी कलांचे प्रदर्शन करतात.
5. जंगल बुक अनुभव:
ट्युस्कर ट्रेल, बंदीपुर वन्यजीव संरक्षित आहे, कर्नाटक विस्तृत वन्य जीवनाला आपल्या समोर आणते. येथील भव्य अंतरिक सजावट आणि खासगी बाल्कनी एका आकर्षक मोहकतेचा अनुभव देते. हे रिसॉर्ट आपणाला मैदानी खेळ, सहली, खुल्या आणि ताज्या हवेतील जेवणाचा आस्वाद आणि पोहोण्याच्या कार्यक्रमच्या उपलब्धी देतात. आमच्या कर्नाटक होलीडे पॅकेजेस छान सुट्टीच्या अनुभवासाठी परिपूर्ण आहेत.
6. वन्यजीवसृष्टी :
जागतिक वारसा स्थान म्हणजे काझीरंगा, या राष्ट्रीय उद्यानातील द वाइल्ड ग्रास लॉज, काझीरंगा नॅशनल पार्क, आसाम हे सर्वात जुने रिसोर्ट आहे. अद्वितीय शैली, भव्य वास्तुकलेचा उत्तम नमुना असणारे हे रिसॉर्ट उत्कृष्ट सेवा आणि सोईसुविधा देते. या रिसॉर्ट मधून गेंडे आणि जंगली हत्ती यांची सुंदर दृश्ये आपणाला पहायला मिळतात.
7. जंगलाच्या राजाप्रमाणे जगा!
द ट्री हाऊस हाइडअवे रिसॉर्ट, बांधवगड नॅशनल पार्क, मध्य प्रदेश आपणास निसर्गाची जवळीक साधू शकणाऱ्या विशिष्ट भागाचा अनुभव देतो. हे भारतातील सर्वोत्तम आरामदायी जंगल रिसॉर्टपैकी एक आहे. वृक्षांमध्ये बनलेल्या घरामध्ये राहण्याचा अनुभव घेण्याची ही एक उत्तम संधी आहे.
कशा प्रकारे जंगलात जगले पाहिजे याबद्दल आतापर्यंत आपण केवळ स्वप्न पाहिले असेल किंवा कल्पना केली असेल. तुमच्यासाठी हि एक संधी आहे जंगलात पराक्रमी राजाप्रमाणे जगण्याची! आपण या नेत्रदीपक वन्यजीव रिसॉर्ट्स पैकी एक निवडा, तो आरक्षित करा. तेव्हा या उन्हाळ्यात वन्यजीवांचे सौंदर्य असे अनुभवा कि जणू काही निसर्ग त्याच्या कुशीत घेऊन तुमचे लाड करत आहे.