एक उष्णकटीबंधीय बेट, आणि समुद्रकिनार्यांच्या प्रेमात असणाऱ्यांसाठी स्वर्गच, मॉरिशस हे काही काळा पासून आपल्याला हवेहवेसे वाटणारे व सुट्यांच्या आनंद घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण बनले आहे, आणि ते हि एका चांगल्या कारणांसाठी. आणि आपण जर पाहिलेत तर मॉरिशसचे हवामान हे वर्षभर तसे समानच राहते, त्यात फारसा बदल दिसत नाही, या सुंदर अश्या बेटाला भेट देण्यापूर्वी, काही गोष्टी मात्र तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात.
मॉरिशसचे हवामान – तापमान
तसे पाहायला गेले तर मॉरिशसला वर्षभर सौम्य आणि उष्णकटिबंधीय हवामानाची आशीर्वादरुपी देण मिळालेली आहे. ज्यामुळे तापमानावर फारसा काही परिणाम होत नाही आणि बदल हि होत नाही. मॉरिशस मधील हवामान हे नेहमी सुखावह आणि निरभ्र असते. या सुंदर देशाकडे तसे दोन हंगामे आहेत; एक नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत दमट उन्हाळा, आणि दुसरा जून ते सप्टेंबरपर्यंत थंड हिवाळा. ऑक्टोबर आणि मे मॉरीशसमध्ये नेहमी बदलाचे महिने राहिलेत. इथे वर्षात सर्वात उष्ण महिना जानेवारी आणि फेब्रुवारी, सरासरी तपमानासह २९.२ डिग्री सेल्सिअस. आणि सर्वात थंड महिना पाहिलात तर १६.४ डिग्री सेल्सियसच्या तापमानसह तो जुलै आणि ऑगस्ट.
पावसाळा
मॉरिशसचे हवामान हे कुठल्या हि जादू पेक्षा कमी नाही! तसे बहुदा या देशात एका बाजूला पाऊस पडत असतो तर त्यापासून काही किलोमीटरवर तुम्हाला तजेलदार उन हि पाहायला मिळेल. तसे बहुतेक महिन्यांमध्ये पाऊस पडत असतो, पण डिसेंबर ते एप्रिल दरम्यान इथे जास्त प्रमाणात पाऊस पाहायला मिळतो. या महिन्यांमध्ये अधूनमधून उष्णकटिबंधीय चक्रीवादळे हि येत असतात, ज्यामुळे बेभान वाऱ्यासह इथे प्रचंड पाऊस पडतो. अर्थातच पाऊस तसा प्रदेशा नुसार वेगवेगळा पडतो. पण दीर्घ कालावधी साठी, म्हणजेच एका वर्षभरात इथे २१०मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. काय सुंदर समुद्र किनारे असतील!
सूर्यप्रकाशातील तास
मॉरिशसच्या बेटांवर दररोज ६.५ ते ८ तासांपर्यंत सूर्यप्रकाश टिकून असतो. उन्हाळ्यात इथे लवकर सूर्योदय होतो, अगदी ५ वाजता, तर हिवाळ्यात एक तास उशिरा होतो. उन्हाळ्यात उंच प्रदेशांवर इथे तजेलदार उन पाहायला मिळते तर किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये इथे ७.५ ते ८ तास चमकदार सूर्यप्रकाश पाहायला मिळतो. आणि हिवाळ्यात केंद्रीय पाठरांमध्ये ५ तास सुर्यप्रकाश पाहायला मिळतो तर किनारपट्टीला ७.५ तास.
सागरी तापमान
वर्षभर मॉरिशसमध्ये सागरी तापमान हे आनंददायी असते, उन्हाळ्यात २६-२९ डिग्री सेल्सिअस तर हिवाळ्यात २३-२५ डिग्री सेल्सिअस तापमान इथे अनुभवायला मिळते. वातावरणातील प्रचंड दाबाच्या पट्ट्यामुळे तापमान २ ते ३ अंशापर्यंत कमी होतानाही दिसते. उत्तम सागरी परिस्थितींमुळे येथे एक सुंदर बेट पाहायला मिळते. हे बेट उत्तम ठिकाण आहे जिथे तुम्ही पाण्याखाली पोहणे शिकू शकता त्याच प्रमाणे इथे अनेक प्रकारच्या सागरी खेळांचा आनंद हि घेऊ शकता. जास्त पावसामुळे इथे सागरी पाण्याच्या तापमानात बदल होऊ शकतो.
वारा
मॉरिशसची सफर म्हणजे पायाखाली रेती, हवेत उडणारे केस; मॉरिशसमध्ये सूर्य हा कायम विषुवृत्तावर स्थिर असल्यामुळे या देशाचे तापमान अतिशय उष्ण असते. येथून वाहणारे वारे हे उष्णतायुक्त उच्च-दाब क्षेत्रातून पृष्ठभागावर वाहत असतात. दक्षिण-पूर्वेकडून वाहणाऱ्या वार्यांचा थेट मॉरिशसच्या हवामानावर परिणाम होतो.
येथील वारे बेटाच्या दक्षिणेकडील पर्वतरंगांकडे ढगांना आर्द्रता शोषण्यासाठी ढकलतात आणि त्यानंतर ढग हळू हळू आपली आर्द्रता पावसाच्या स्वरुपात सुसाट वाऱ्यासह जमिनीवर सोडतात, परिणामी इथे जास्त पाऊस पडतो.
वादळे
आधी उल्लेख केल्या प्रमाणे दक्षिणपूर्व भागातून वर्षभर वाहणारे हे वारे निरुपद्रवी आणि सुखद असतात. पण वादळा दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. हि वादळे जानेवारी ते मार्चच्या दरम्यान निर्माण होतात. या काळात पाणी आणि हवेते तापमान लवकर वाढते. आकडेवारी प्रमाणे मॉरिशस हे दर पाच वर्षात वादळांचे केंद्रस्थान बनले आहे. असे असले तरी तीन ते पाच वादळांचे अवशेष इथे पाहायला मिळतात. चक्रीवादळातील सतर्कतेच्या बाबतीत, सार्वजनिक इमारतींमध्ये किंवा चर्चमध्ये ताबडतोब निवारा शोधावा. तसे काही तासांनंतर हवामान शांत होते.
मॉरिशसचे हवामान – भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ
परीवासासोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मॉरिशस हे उत्तम ठिकाण आहे. मॉरिशसचे हवामान हे वर्षभर उबदार आणि आनंददायी असते. संपूर्ण वर्षभरात मॉरिशस हे भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. सागर प्रेमींसाठी, उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. हिवाळ्यातील महिन्यांमध्ये मॉरिशसच्या हवामानातील आर्द्रता कमी झाल्याने आपण हायकिंग, ट्रेकिंग, क्वाड बायकिंग सारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होवू शकता. डिसेंबर ते मार्च दरम्यान स्वच्छ पाण्यामध्ये डायविंग उत्साही डायविंगचा आनंद घेऊ शकतात.
मॉरिशस हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्ही सर्वकाही मिळवू शकता. आमच्या थॉमस कुकमध्ये मॉरिशसचे सर्वोत्तम टूर पॅकेज तपासा.