आपल्या पैश्याचा पाकिटाला आनंदी ठेवण्यासाठी आपण दिवसोंदिवस मेहनत घेत असतो, कष्ट करत असतो पण आता वेळ आली आहे विचार करण्याची, जे आपण करत आहोत त्याने खरोखर आपल्यला आनंद मिळतो का? आपल्या आयुष्यात ते सुख प्राप्त करून देत आहे का? कपडे, घर, वाहने यांच्या उपभोगावर अमाप पैसा खर्च करून मिळणारा आनंद हा चीरक्काल नसतो, तो फार काळ टिकत नाही. तो काही काळा नंतर अस्पष्ट होत जातो, बरोबर ना? आपल्यापैकी बरेच जण त्या अमर्याद आनंदाच्या शोधात असतात, जो त्यांना आयुष्यभर पुरेल आणि त्याचा स्त्रोत म्हणजे अनुभव. होय अनुभव. अनुभव हा आपल्या आयुष्यभर सोबत असतो, म्हणूनच तुम्ही आपल्या प्रवासावर पैसे खर्च करा, त्या प्रवासातील अनुभवावर पैसे खर्च करा, गोष्टींवर नाही.
1. ज्याला कुठलीही कालबाह्य तारीख नाही:
आयुष्यात अनुभव हे बहुमोल असतात जे कुठलीही कालबाह्य तारीख घेऊन येत नाही, ते चिरकाल आपल्या सोबत असतात. त्यांना मोजण्यासाठी कुठले प्रमाण नसते पण जेव्हा ते आठवणी स्वरुपात आपल्या सामोर येतात तेव्हा मात्र आपल्या चेहऱ्यावर एक गोड हसू येते, त्या आठवणीत आनंदात आपण रमत जातो. कल्पना करा व्हिएतनाममध्ये मोटरबाइकिंगची! ज्याला आपण खरे पैश्याचे महत्व म्हणूयात.
2. आपली ध्येयवेड आवड शोधणे:
तुमचा अनुभव खर्चिक असावा असे काही नाही, पण तो तुम्हाला तुमची आवड शोधण्यास मदत करणारा, त्यातून आनंद देणारा तर नक्की हवा. अनुभव हा एक असा शिक्षक आहे जो तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात, तुम्ही आपल्या आठवड्याअंती वेळ कसा घालवतात यावर देखील मार्गदर्शन करत असतो. जर तुम्हाला हायकिंगची आवड असेल, त्यातून तुम्हाला मनसोक्त आनंद मिळत असेल तर आपण मलेशिया स्थित तामन नेगारा नॅशनल पार्क सर करण्याची स्वप्ने नक्की पहावी.
3. तिसरी नजर:
विविध संस्कृती, विविध सामाजिक बाबींबद्दल जाणून घेण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे प्रवास आणि त्या प्रवासा दरम्यान येणारे अद्वितिय अनुभव. आपण जगाला ज्या दृष्टीकोनातून पाहत आसतो आपण त्याला तिसरी नजर म्हणूयात. तुर्की स्थित कप्पादोकिया येथील सूर्योदय पाहण्यासाठी तर तुम्ही नक्कीच वेळ काढायला हवा. जो सदैव तुमच्या हृदयात राहील.
4. एक उत्तम शिक्षक:
अनुभव तुम्हाला काही अश्या गोष्टी शिकवतो ज्या तुम्हाला कुठल्या वर्गखोलीत शिकायला मिळणार नाही. अनुभव तुम्हाला जीवनावश्यक धडे शिकवत असतो, जे तुम्हाला इतर कोणीही शिकवत नाही. आपल्या आयुष्याच्या वळणावर जेव्हा तुम्हाला असे वाटते कि आपण आता एखाद-दोन महिने थोडे थांबुयात तेव्हा तुम्ही आपल्या बॅग भरून ऑस्ट्रेलियातील किनार्यालगतच्या शहरांमध्ये नक्की जायला हवे, तेथील अनुभव तुमच्या आयुष्यात एक वेगळे परिवर्तन नक्की आणेल.
5. उत्तम आयुष्य:
अर्थपूर्ण अनुभव तुम्हाला आयुष्यात ‘जीवनाचे आभार मानण्याची’ संधी देतात. अनुभव जगण्याची भावना तुम्हाला तरुण करते. असाच अनुभव तुम्ही घेऊ शकता फिरोडलँड मधील कयाकिंग मध्ये जे स्थित आहे न्यूजीलॅंडमधील दक्षिण आयलँडच्या इथे.
6. मस्तिष्कात आठवणींचा ठेवा:
अनुभवात गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यात तुम्हाला अविस्मरणीय आठवणी आणि आनंदाचा एक ठेवा मिळतो. या आपल्या मस्तिष्कात, आपल्या हृदयात अमर्यातीत आठवणींचे ठसे उमटवून ठेवतात ज्यांना पुसणे तर अशक्यच असते. एक असाच अनुभव तुमची कॅनडा मध्ये वाट पाहत आहे जिथे तुम्ही ब्रिटिश कोलंबियात उंच बर्फावरून स्कीच्या मदतीने बर्फावरून घसरण्याचा आनंद घेऊ शकता.
7. धैर्यतेला जागृत करणे:
अनुभव तुम्हाला प्रेरणा देतात, तुम्हाला आव्हान देतात, तुम्हाला तुमच्या आरामदायी स्वस्थ चौकटीतून बाहेर काढतात. ते तुम्हाला आव्हानात्मक निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करतात, आणि हीच वेळ आहे तुमच्यातल्या धैर्यतेला जागृत करण्याची. एक असाच थरारक अनुभव आम्ही तुमच्या पायाशी घेऊन येत आहोत ताजिकिस्तान मधील पामीर मधे.
8. मोहित करणारे क्षण:
अनुभव हे फायदेशीर असतात आणि बदल्यात ते तुम्हाला खूप काही देऊन जातात. सात ते आठ माही पर्यंत तुम्ही त्या अविस्मरणीय अनुभवांना साठवून ठेऊ शकता. जे तुम्हाला नेहमी प्रेरणा देत राहतील, तुम्हाला आनंदी ठेवत जातील आणि तुम्हाला महत्वकांशी बनवत जातील. जेव्हा तुम्ही आपल्या प्रवासातील अनुभवांवर पैसे खर्च करतात तेव्हा तुम्ही स्वतःलाच एक अमर्यात मोहक क्षणांची भेट देत असतात. असेच मोहक क्षण तुम्हाला स्वीडनमधील लॅपलॅंड येथे नॉर्दर्न लाइट्स पाहताना मिळतील.
आपले आयुष्य या प्रवास अनुभवांनी भरून घ्या, जे तुम्हाला अश्या सुख समाधानाने परिपूर्ण करतील जे तुम्ही पूर्वी कधीही न अनुभवलेले असेल. अनुभव हि एक अशी गुंतवणूक आहे ज्याचे परतावे तुम्हाला आयुष्यभर मिळतील. तर मग कसली वाट पाहताय? चला जग प्रवास करूयात, अनुभवांवर खर्च करूयात!