पासपोर्ट केवळ चार रंगात का येतात याची आश्चर्यकारक कारणे :


Wednesday, February 28, 2018

याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का तुमचा पासपोर्ट या प्रकारचा का आहे? तुम्हाला हे माहित आहे का कि तुमची ओळख आणि नागरिकत्वाचा मुख्य पुरावा असणारा तुमचा पासपोर्ट फ़क़्त ४ रंगातच का येतो?  लाल, निळा, हिरवा आणि काळे हे चार रंग जगभरात सर्वात सुसंगत रंग आहेत. याआधी आपल्याला आश्चर्य वाटले असेल किंवा नसेल पण पासपोर्ट फ़क़्त ४ रंगातच का उपलब्ध आहेत याबद्दल आमच्याकडे आपल्याबरोबर शेअर करण्याकरिता काहीतरी मनोरंजक माहिती आहे.

इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनने पासपोर्ट आकार आणि पद्धत यांविषयी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत तरी देशांना या चार प्राथमिक रंगांचा रंगछटांवर प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य आहे. पासपोर्ट रंग अनेकदा देशांच्या भूगोल आणि धोरणांशी संबंधित असतात. आर्टन ग्रुपचे उपाध्यक्ष ह्र्यांत भोगोसीयन यांच्या मते तसेच इंटरअॅक्टीव्ह पासपोर्ट डेटाबेस, पासपोर्ट इंडेक्स यांच्याशी निगडीत एक फर्मनुसार काही तार्किक कारणे आहेत ज्यात राष्ट्राद्वारे बनणाऱ्या पासपोर्टमध्ये गुणधर्मानुसार रंगांची निवड आणि बऱ्याच संभाव्य परिदृश्यांस विशेषता असू शकते.

हिरवा रंग असलेला पासपोर्ट :

काही देशांमध्ये, पासपोर्ट रंगाचा पर्याय प्रामुख्याने धर्मांवर अवलंबून असतो. ज्या देशांमध्ये इस्लाम प्रमुख धर्म आहे त्या देशांमध्ये हिरव्या रंगाचे पासपोर्ट आहेत. हिरवा रंग संदेष्टे मुहम्मद यांचा आवडता रंग मानला जातो. मुस्लीम देश जसे की पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि मोरोक्कोमध्ये हिरव्या रंगाचे पासपोर्ट आहेत. तसेच बर्किना फासो, आयव्हरी कोस्ट, सेनेगल, नायजेरिया आणि नायजर यासह अनेक आफ्रिकन देशांमध्ये हिरव्या पासपोर्ट आहेत याचे कारण हि राष्ट्रे पश्चिम आफ्रिकन राज्यांच्या आर्थिक समुदायाचे सदस्य आहेत.

लाल रंग असलेला पासपोर्ट :

लाल रंग कम्युनिस्ट चळवळीचा रंग मानला जातो. ह्र्यांत भोगोसीयनुसार, लाल रंगाचे पासपोर्ट साम्यवादी भूतकाळाला किंवा वर्तमानकाळ दर्शवते. चीन, सर्बिया, लाटविया, रोमानिया, जॉर्जिया आणि पोलंड या देशांमध्ये लाल पासपोर्ट आहेत. तसेच, युरोपियन युनियनमधील देशांमध्ये बरगंडीच्या छटासह पासपोर्ट आहेत.

निळा रंग असलेला पासपोर्ट :

ज्या देशांमध्ये निळा पासपोर्ट आहे ते देश न्यू लीग ऑफ नेशन्सचे आहेत, ज्यामध्ये भारत, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. तसेच, कॅरिबियन समुदायाच्या सदस्य असलेल्या राष्ट्रांमध्ये निळा पासपोर्ट आहे. कारण ते भौगोलिकदृष्ट्या महासागर आणि सागर किनाऱ्याच्या मधोमध आहेत.

काळा रंग असलेला पासपोर्ट :

काळा रंग असणारे पासपोर्ट दुर्मिळ असतात आणि विशेषत: आफ्रिकन देशांद्वारे वापरले जातात. ज्यांमध्ये बांग्लादेश, झांबिया, बोट्सवाना, बुरुंडी, गॅबॉन, अंगोला, मलावी, चाड आणि काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक यांचा समावेश होतो. काळा रंगाचा पासपोर्ट असलेल्या सर्वात प्रमुख राष्ट्रांपैकी न्यूझीलंड एक आहे. येथील पासपोर्टचा रंग त्यांच्या राष्ट्रीय रंगात समक्रमित आहे.

आपण विदेश्यात सुट्टीवर जात आहात किंवा व्यवसायासाठी किंवा अभ्यासासाठी विदेशात प्रवास करत असलात तरी, पासपोर्ट, व्हिसा आणि इन्शुरन्ससह आपल्या महत्वाच्या प्रवासाच्या दस्तऐवजांबद्दल जाणून घेणे नेहमी उपयुक्त ठरते.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

*
*