पावसाच्या पुन्हा प्रेमात पडा : मान्सूनसाठी भारतातील १० ठिकाणे


Friday, March 2, 2018

भारतातील मान्सून अद्वितीय आहेत. या देशात जून ते ऑगस्ट या दरम्यान भरपूर पाऊस पडतो. मे महिन्याच्या प्रखर उष्णतेमुळे वातावरण कोरडे होते. मात्र त्यानंतर या मौसमात ओलावा भरपूर मिळाल्यामुळे जीवन मनाला नवीन झळाळी येते. आपल्या लोकगीते, चित्रपट, नाटकं आणि प्राचीन ग्रंथांमध्ये या मोसमाला का स्थान दिले जाते यात काहीही नवल नाही. तेव्हा या ओल्या मौसमात आपल्या घरात न बसता खाली दिलेल्या ठिकाणांची मजा अनुभवा. तुमची निराशा होणार नाही हे मात्र नक्की. तर आम्ही घेऊन आलो आहोत मान्सूनसाठी भारतामधील १० प्रसिद्ध ठिकाणे फक्त तुमच्यासाठी!

भारतातील मान्सूनचे प्रमुख ठिकाणे

  1. लोणावळा, महाराष्ट्र:

जर तुम्हाला ओलावा, पाऊस, ढग यांनी वेढलेले आवडत असेल तर मान्सूनमध्ये महाराष्ट्रातील लोणावळा तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पश्चिम घाटाच्या वरच्या पट्टीवर इथे एक छोटी सहल किंवा इथे विलक्षण  छोट्याश्या गावात राहणे आपल्या संवेदनांना ताजे करण्यासाठी पुरसे आहे.

मान्सूनची जादू

 त्याच्या थंड हवामानासाठी प्रसिद्ध, या ब्रिटीश काळातील शहरात पावसाळ्यात हिरवळीची उधळण होते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग ४ चा वापर करून लोणावळ्याला जाणारा प्रवास हा अगदी लोणावळ्या प्रमाणेच संस्मरणीय ठरेल.

अजून काय आहे?

 लोणावळामध्ये असताना अंबी व्हॅलीला जाण्याची संधी गमावू नका. आपल्याला या ठिकाणाशी जोडणारी रस्ता पावसाळ्यात अतिशय मनमोहक होतो. लोणावळ्याने भारतातील सर्वोत्तम मान्सूनच्या ठिकाणांच्या यादीत स्वतःचे वेगळे स्थान तयार केले आहे. तेव्हा इथे जाण्याची संधी गमावू नका.

2. कोडाईकनाल, तामिळनाडू:

पावसाळ्यात हिरवळीत स्वतःला हरविण्याचे विचार तुम्हाला उत्तेजित करतात का? जर उत्तर होय असेल तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत कोडाईकनालला भेट द्यावी.

मान्सूनची जादू

 या हंगामात, संपूर्ण हिल स्टेशन ताजे आणि हिरवेगार दिसते. या काळात झाडांच्या माध्यमातून पाऊस-धूळ चिखल यांचा दरवळणारा मोहक सुगंध दरवळतो, जो आपल्या भावनांना पुनरुज्जीवित करतो. या हंगामात कोडाईकनालसारखे ठिकाण हौशी छायाचित्रकारांचे स्वप्नवत ठिकाण आहे. इथे तुमच्याकडे संधी आहे सूर्य ढगांशी लापाछपी खेळत असताना धुक्याने वेढलेल्या आनंददायी डोंगररांगांचे आणि आजूबाजूच्या रमणीय भूप्रदेशांचे फोटो काढण्याची!

अजून काय आहे?

पावसाळ्यात या हिल स्टेशनजवळील शोला आणि सिल्व्हर कास्केड या धबधब्यांतून खळाळत वाहणारे पाणी हे आपल्याला आपल्या पसंतीच्या वॉलपेपरचे स्मरण करून देतील.

3. कूर्ग, कर्नाटक:

भारताचे स्कॉटलंड म्हणून प्रसिद्ध असणारे, कर्नाटकमधील कूर्ग हे नयनरम्य डोंगराळ दृश्यांसाठी नावाजलेले आहे.

मान्सूनची जादू

 पावसाळ्यामध्ये कुशलनगरच्या पुढे डोंगराळ प्रदेशात प्रवास करा जिथे सर्वव्यापी धुक्यामुळे वेढलेल्या परिसरात आपल्याला इतरत्र काहीही दिसत नाही. सुदैवाने, आपल्याला या रस्त्यावर फार कमी सहकारी प्रवासी दिसतील, त्यामुळे तुमचा प्रवास अधिकच सुखमय होईल. वर चढत असताना येथील प्रत्येक भागात हिरवळीने नटलेला आहे यात संकोच नाही आणि जर तुमचा रस्ता ढगांनी अच्छादलेला नसेल तर तुम्हाला दूरवरच्या ढगांनी व्यापलेल्या टेकड्यांचे सुंदर दृश्य पाहता येईल.

अजून काय आहे?

आपल्या ठिकाणावर पोहोचल्यावर, आपण कोर्गी घराच्या उबदार वातावरणात आराम करण्याची किंवा थॅडियान्डमोल शिखरावर चढाई करण्याची निवाड करू शकता. ज्याला आपले प्राधान्य असेल, त्याने तुम्हाला आनंदच होईल.

4. शिलाँग, मेघालय:

जर तुम्हाला पावसाळी ढगांना भेटण्याची इच्छा असेल तर तुम्ही मेघालयात शिलाँगला आपल्या अग्रसुचीत ठेवावे. जेव्हा राज्याला ‘ढगांचे निवासस्थान’ असे म्हटले जाते, तेव्हा तुम्ही अंदाज लावू शकता की मान्सूनमध्ये इथे काय परिस्थिती असेल.

मान्सूनची जादू

येथील पावसाची तीव्रता आपल्या आसपासच्या जगाला मंदावते. कार, लोक, प्राणी … प्रत्येकाने मेघालयात प्रकृती मातेला नमस्कार केला पाहिजे.

अजून काय आहे?

शिलाँगमध्ये एकदा तरी हत्ती धबधब्याकडे जायला हवे जिथून मेघगर्जना ऐकू येते.

5. पोंडीचेरी – भारतातील सर्वोत्तम मान्सूनचे एक ठिकाण

पोंडीचेरी, ज्याला पोंडी म्हटले जाते, ते त्याच्या किनारांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळयात केंद्रशासित प्रदेशांना भेटी दिल्यामुळे आपण येथील समृद्ध जीवन आणि हिरवळीने नटलेले आसपासचे डोंगराळ प्रदेश यांचा अनुभव घेऊ शकतो.

मान्सूनची जादू

पावसाळ्यात पॉन्डी शहराच्या किनार्यांवरून चालत असताना, आपण भिंतीला धडकून अंगावर तुषार उडवणाऱ्या बंगालच्या उपसारातील उसळणाऱ्या लाटंचा आनंद घेऊ शकता. सलन-ग्रे, अगदी जमिनीवर येणाऱ्या आर्द्रतायुक्त ढगांनी पॉन्डीमध्ये आपले स्वागत होते. पावसाळ्यात पोंडिचेरीला भेट देण्याचा आणखी एक फायदा म्हणजे फार कमी पर्यटक येतात. म्हणून पुढे व्हा आणि पावसाळ्यात हे जग संथ असताना इथे काही मदिरासह इंडो-फ्रेंच पाककृतीचा आनंद घ्या. भारतात पॉंडिचेरीचे स्थान निश्चितपणे अग्रस्थानी आहे.

अजून काय आहे?

सुट्टीमध्ये आराम करायला आपण प्राधान्य देतो आणि अशावेळी ऑरोव्हिले युनिव्हर्सल सिटी एक भेट आवश्यक आहे. जिथे ढगांच्या घेरावात हिरवट हिरव्यागार लॉन्समध्ये मध्यभागी बसून आपण ध्यान करू शकता.

  6. रानीखेत, उत्तराखंड

उत्तराखंड राज्यातील रानीखेत एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. जे त्याच्या आश्चर्यकारक नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला ‘राणीचे कुरण’ म्हणून ओळखले जाते. हे विलक्षण शहर समृद्ध अशा हिरव्या जंगलातील पाईन वृक्षांचे आकर्षक दृश्य दर्शवते.

मान्सूनची जादू

पावसाळ्यामध्ये जंगलातून जाणाऱ्या ढगांचं दर्शन होतं ज्याने आपण कधीही न अनुभवलेल्या या हिल स्टेशनचा एक नवा चेहरा समोर येतो. या हंगामात हिरव्यागार टेकडीतून चालत जाणे हे आपणास उत्साहवर्धक बनविण्याची हमी देते. एक सल्ला – पावसाळ्याच्या सुरवातीच्या महिन्यात या ठिकाणाला भेट द्या कारण जेव्हा पावसाचा जोर वाढतो भूस्खलन होण्याचा धोका तीव्रतेने वाढतो.

अजून काय आहे?

भालू धरणाच्या हिरव्या सौंदर्याचा आनंद घ्या आणि ८ व्या शतकाची देवता झुलादेवीचे देवस्थान व निश्चल हैदाखन मंदिर यांची शांती अनुभवा.

7. वायनाड, केरळ

कोझिकोडपासून केवळ ७० किमी वर वसलेले, वायनाड हे मान्सूनमध्ये भारतातील सर्वात चांगले ठिकाण आहे. केरळ प्रवासाच्या प्रत्येक यादीत याचा समावेश आढळतो.

मान्सूनची जादू

भारतातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणांपैकी एक असणाऱ्या या ठिकाणावर मान्सूनचा आनंद घेण्यासाठी पर्यटक ऑगस्ट महिन्यामध्ये गर्दी करतात. चहा, कॉफी, मसाले, बीटल नट आणि रबराची झाडे आणि थंड हवा यांसोबत तुम्ही ट्रेकिंगसारख्या उपक्रमाचा मनमुराद आनंद उपभोगू शकता.

अजून काय आहे?

बनासुरा डोंगरावर ट्रेकिंग करा, एद्द्क्कल गुफांचा शोध घ्या आणि विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कुरुवा बेट आणि वायनाड येथे चहाच्या बागेत चालण्याचा आनंद घ्या.

8. मुन्नार, केरळ

मान्सूनमध्ये केरळच्या मुन्नारला भेट देताना मसाल्याची झाडे आणि चहाचे मळे आपले स्वागत करतात. मुन्नार खरंच भारतातील सर्वात सुंदर स्थळ आणि लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे.

मान्सूनची जादू

प्रत्येक सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा झाडांच्या पानांवरून दवबिंदू जणू आळशीपणे घरंगळत असतील. हे ठिकाण ऑगस्टमध्ये एखाद्या नंदनवनपेक्षा कमी नाही. धुक्यात हरवलेल्या उंच पर्वतरांगांची दृश्ये नक्कीच आपल्या आत्म्याला पुनरुज्जीवित करतील. निसर्गात रमण्यासाठी काही शांत वेळ शोधत असाल तर मुन्नार इथे नक्कीच भेट द्या.

अजून काय आहे?

मान्सूनमध्ये कमी किमतीत आपण या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकता कारण हे ऑफ-सीझन मानले जाते.

9. गोवा

लोक सहसा असे म्हणतात की तुम्ही गोव्यात मान्सूनच्या काळात जाऊ नये. पण थांबा, हे आमच्या भारतातील मान्सूनच्या ठिकाणांच्या यादीमध्ये  आहे. निरभ्र आकाशाचे हे राज्य उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात प्रवास करण्यास जसे उपयुक्त आहे तसेच ते पावसाच्या दरम्यान देखील तितकेच उत्साहवर्धक असू शकते. गरज फक्त इतकीच आहे कि आपण योग्य ठिकाणी भेट द्या आणि या फक्त हंगामामध्ये होणाऱ्या उपक्रमांचा आनंद घ्या.

मान्सूनची जादू

या मोसमात फक्त गोव्याचे समुद्रकिनारेच नाही तर पश्चिम घाटावरच्या श्वास रोखून धरणाऱ्या ठिकाणांवर ट्रेकिंग करा. गोवा राज्यात मान्सूनच्या वेळी आपणास देण्यासारखे भरपूर काही आहे. तेव्हा मान्सूनमध्ये गोव्याच्या नयनरम्य सौंदर्याला स्वत: शरण जाण्यासाठी तयार व्हा.

अजून काय आहे?

मान्सूनच्या दरम्यान, आपण वन्यजीव अभयारण्याला भेट देऊ शकता. हिरवीगार मसाल्याच्या मळ्यांचा आणि दुधसागर येथील धबधब्याचा फेरफटका मारू शकता. तेव्हा मान्सूनमध्ये गोव्याच्या नयनरम्य सौंदर्याला स्वत: शरण जाण्यासाठी तयार व्हा.

10. चेरापुंजी, मेघालय

जर तुम्हाला कडाडणारे ढग आणि विपुल प्रमाणात पाऊस यांचा त्रास होत नसेल तर चेरापुंजी तुमच्यासाठी आणखी चांगले ठिकाण आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त प्रमाणात पाऊस पडण्याचा विक्रम असणारे मेघालयातील हे ठिकाण आपल्याला हिरव्या जमिनी आणि डोंगरांवर भटकण्याचा आनंद देते. मुबलक हिरवळ आणि दुहेरी थर असणाऱ्या झाडांची पूल हि दृश्ये आपणास अमूल्य वाटतील.

अजून काय आहे?

पावसाळ्यात मेघालयामध्ये चहाचे अनेक कप पिण्यास विसरू नका, जे दार्जिलिंगच्या चहापेक्षा बरेच वेगळे आहे. मान्सूनच्या इतर ठिकाणी जाताना कदाचित मजा येईल, पण या हंगामात चेरपूंजीला भेट देण्यात एक वेगळीच मजा आहे.

हा मान्सून हंगाम हा भारतातील मान्सूनच्या ठिकाणी प्रवास करून एक संस्मरणीय असा बनवा. आम्ही हमी देतो की आपण आपल्या सर्व मित्र आणि कुटुंबियांमध्ये आपल्या या सफरीबद्दल नक्कीच बढाई मारणार!

 

Share This

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

*
*