कोणी समजूतदार व्यक्तीने म्हटलेच आहे ‘आरोग्य हीच संपत्ती आहे’. आपण हे हजारदा एकले आहे. म्हणूनच निरोगी आरोग्यासाठी आपण नियमित व्यायाम, निरोगी आहार आणि अजून काय करत नाही! उत्तम आरोग्य आणि नेहमीच ताजेतवाने राहण्यासाठी अजून एक छान उपाय म्हणजे प्रवास! होय, हे आश्चर्यजनक आणि अविश्वसनीय आहे, नाही का? पण वर्षातून एक चतुर्थांश काळ प्रवास हा डॉक्टरांना आपल्यापासून दूर ठेवतो! कसे ते इथे आहे:
प्रवासाचे आरोग्यदायी लाभ :
- आनंदाचा मंत्र : ज्या मिनिटाला आपण एखाद्या प्रवासाच्या योजनेची आखणी सुरू करता, तेव्हा तुमच्या आनंदात वाढ होते. वस्तुतः पहिले तर जेव्हा तुम्ही एखाद्या सहलीला निघता त्यावेळी ती भावना तुम्हाला आपले आरोग्य, कल्याण, कुटुंब, नातेसंबंध बाबत अधिक आनंदी ठेवते. आणि हे सरे विद्यापीठाचे प्राध्यापकांच्या संशोधनानुसार सिध्द केलंय कि काही विकत घेण्याच्या आनंदापेक्षा प्रवास किंवा सफारीचा अनुभव तुम्हाला जास्त आनंद देतो. तर आपल्या पुढील सफरीची योजना सुरु करा!
- प्रवास नावाचे औषध घ्या!: प्रवासाला जाणे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त आहे! प्रवासाचे अनुभव आपल्याला नवीन वातावरणाची ओळख करून देतात आणि शरीरात मजबूत प्रतिपिंडे तयार करतात. प्रवासामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते. तेव्हा इतर औषधे सोडा आणि प्रवासाचे औषध घ्या!
- तणावाला रामराम म्हणा!: प्रवास केल्याने तणाव मोठ्या प्रमाणात कमी होतो. प्रवासामुळे आपल्याला अराम मिळतो. आपण कमी चिंतीत आणि जास्त आनंदी होतो. प्रवासामुळे तुमची मनस्थिती सुधारते आणि याचा अनुभव आपल्याला प्रवासानंतर अनेक आठवडे येत राहतो. तेव्हा स्वताःची जास्त ओढाताण न करता प्रवासाला निघा आणि आपल्या तणावाला आणि चिंतेला रामराम करा!
- बुद्धीला चालना द्या!: प्रवासात आपण नव-नवीन लोकांना भेटतो आणि नवीन परिस्थितींमध्ये समयोजित होतो त्यामुळे प्रवासात आपल्या मनाचा विस्तार होतो. आपण जागतिक स्तरावर आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक जागरूक होतो. प्रवास आपल्या बुद्धीला आणि मनाला चालना देतो. तसेच आपली सर्जनशीलता वाढवतो. व्यक्तिमत्व आणि सामाजिक मानसशास्त्र यांच्या अभ्यास कर्त्यांनुसार जे लोक प्रवास करतात ते अधिक खुल्या मनाचे आणि भावनात्मक स्थिर असतात.
- हृदयरोगांना नाही म्हणा!: जे लोक दरवर्षी किंवा नियमितपणे प्रवास करतात ते ताण, चिंता यांपासून मुक्त होतात आणि त्यांच्या ताण देणार्या घटकांपासून मुक्त रहातात. अशाप्रकारे त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकार होण्याची शक्यता कमी असते. फ्रँमिंगहॅम यांचा ह्रदयाच अभ्यास देखील हेच सांगतो.
- स्वस्थ राहा!: जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा नवीन जागा पाहण्यासाठी उत्सुक असता. आपण तेथे राहण्यासाठी वेळ आणि पैसा करता तुम्ही सहजतेने साहसी खेळ निवडता, शहरातील रस्त्यावरून चालण्याचा आनंद घेतात, हायकिंगची मजा घेतात, आणि अशाप्रकारे प्रवास तुम्ही स्वस्थ आणि चपळ बनवता.
- उपचार करण्याची महाशक्ती: असे म्हणतात कि वेळ सर्वकाही व्यवस्थित करते! होय, हे खरे आहे, परंतु तुम्हाला माहित आहे की या प्रवासात रोग बरे करण्याचे महाशक्ती आहे? पृथ्वीवरील अनेक ठिकाणे आहेत जिथे निसर्ग तुमच्या मनावरचे घाव किंवा जखम भरून काढते. स्टोनहेज, इजिप्तचे पिरामिड, मेने मधील माईन डेझर्ट बेट, टर्की, आइसलँड आणि कोस्टा रिका हे या जागांपैकी आहेत.
- नातेसंबंध सुधारा!: प्रत्येक जण भावना, नातेसंबंध सांभाळण्यात चांगला असतोच असे नाही. तुम्हाला सांगण्यात आनंद होतोय कि एक नातेसंबंध विशेषज्ञ अस्तित्वात आहे आणि तो म्हणजे प्रवास! प्रवास केल्याने आपले विद्यमान संबंध सुधारतात आणि आपल्याला नवीन नातेसंबंध विकसित करण्याची संधी देखील मिळते. आपल्या भावनात्मक अवस्थेला चांगले बनवते. प्रवास आपल्याला आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल आभारी होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील लोकांना महत्त्व देण्यास शिकवतो.
- चिरायू व्हा!: नक्कीच तुम्ही तुमचे आयुष्य एका राजाप्रमाणे जगायला हवे मात्र ते दीर्घ सुद्धा हवेच! आणि प्रवास हे सुनिश्चित करेल की आपण दीर्घ आणि निरोगी जीवन जगाल. हे खरे आहे की जे लोक प्रवास करतात त्यांचे आयुष्य अधिक काळ असते. प्रवास आपल्याला कमी ताण, कमी चिंता, अधिक आनंद देतो. आणि अधिक आनंद नक्कीच दीर्घ जीवन देते. तर प्रवास करा आणि राजाप्रमाणे दीर्घकाळ जगा.
तर आधी या प्रकाशात प्रवास दिसत नव्हता, बरोबर? आता आपल्याला प्रवासाची जादू माहित आहे, तेव्हा आपल्या पुढील सफरीची योजना बनवा! तेव्हा आणि व्वारांवार प्रवास तर नक्कीच करा.
आजच आपण डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हॉलिडे पॅकेज बुक करा आणि आपल्याला एक निरोगी जीवन जगण्यास मदत करण्याची संधी द्या.
Related Post
पावसाच्या पुन्हा प्रेमात पडा : मान्सूनसाठी भारतातील १० ठिकाणे