युरोपमध्ये प्रवास करण्याची सर्वोत्तम आणि स्वस्त ठिकाणे


Wednesday, February 28, 2018

जर तुम्ही आपल्या पहिल्या परदेशवारीचे स्वप्न पाहत असाल, तर युरोप हि एक परीकथा आहे जी तुमच्या हातून उलगडण्याची वाट पाहत आहे. आम्ही जाणून आहोत कि युरोप फार महागडे आहे असा तुम्ही विचार करत आहात. तर, तर आमच्याकडे तुमच्या साठी एक भेट आहे. ज्या युरोप बद्दल आम्ही बोलत आहोत ते अतिशय सुंदर व आपल्या खिश्याला अगदी परवडणारे आहे. तर युरोपवारीसाठी तुम्ही आपल्या किडन्या विकण्याचा काही विचार करू नका हंऽ!

खाली यादी आहे युरोप मध्ये प्रवास करण्यासाठी सर्वात सुंदर आणि स्वस्त ठिकाणांची

  • संस्कृतीचा अनुभव घ्या – बर्लिनः जर्मन ची राजधानी बर्लिन, हे युरोपातील सर्वांत आनंददायक सांस्कृतिक ठिकाण आहे. युरोप मध्ये प्रवास करताना येथील कलात्मकतेचा आनंद घ्या, येथील सुंदर प्रदर्शने, वस्तुसंग्रहालये, संगीत, कला आणि सर्वोत्कृष्ट नाट्यमंदिर यांचा अनुभव घ्या. अव्वल जेवणासह सर्व काही, तेही अगदी कमी किमतीत. जर आपल्या बॅग पूर्वीच भरलेल्या असेल तर, चला मग!

  • बियर हा देव – प्राग: प्राग हे अत्यंत सुंदर आहे, जिथे तुम्ही राहण्याचे अक्षरशः स्वप्न पाहता. यात एक अशी मोहकता आहे जी गूढ परंपरेला व संवेदनशील भूतकाळाला धरून ठेवते. आणि प्राग मध्ये, बिअर देव आहे! येथे तुम्हाला जगातील सर्वोत्तम बिअर मिळते. आणि त्याच प्रमाणे प्रागने युरोप मधील सर्वोत्तम परवडणारे ठिकाण म्हणून दुसरे स्थान पटकवलेले आहे.

  • सर्व ट्रेंडचा राजा – इस्तंबूल आपल्या पर्यटकांना आकर्षणाची मेजवानी देतो, ज्यात प्रत्येक प्रकारच्या पर्यटकाला सेवा दिली जाते. येथील विपुल प्रमाणात असलेले स्वस्त निवास, उत्तम जेवण तुम्हाला इस्तंबूल मध्ये राहण्यास भाग पडतात. येथे तुम्ही जगातील सर्वोत्तम क्षितीज पाहू शकता.

  • रात्रींचा राजा – क्रॅकोऊ, पोलंड: क्रॅकोऊ हे तुमच्यातल्या पार्टी प्रेमींसाठी आहे. येथे दर चौरस किलोमीटरवर तुम्हाला, प्रसिद्ध पब मिळतील जिथे तुम्हाला थेट संगीत आणि वोडका अखंडपणे वाहताना मिळेल. क्रॅकोऊ हे प्रवास्यांमध्ये कमी खर्चिक, अन्न आणि मद्यासाठी प्रसिद्ध आहे.

  • आपल्यातल्या रोमांचला जागे करा – झेक प्रजासत्ताक: झेक प्रजासत्ताकमधील सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा. प्रसिद्ध परीकथेच्या इमारती, ऐतिहासिक स्पा, आकर्षक उपहारगृह आणि विस्तीर्ण नद्या या युरोपियन शहराला प्रणयरम्य बनवण्यासाठी मदत करतात. हे सर्व प्रेम तुमच्या आप्तांसाठी आणि यातून तुमच्या खिश्याला झळ हि पोहोचणार नाही.

  • सुर्यातेज तुमच्या खिश्यात – टेनेरिफ, कॅनरी द्वीपसमूह: जिथे उर्वरित युरोप गर्द थंडी मध्ये वेढलेले असते तिथे कॅनरी बेटे वर्षभर उबदार तापमानाचा आनंद देत असतात. आपल्या उत्कृष्ट खाद्यांन्न सोबत इतर बेटांपेक्षा टेनेरिफ हे एक उत्तम बेट आहे, टेनेरिफ आर्ट्स स्पेस, अकॅन्टिलॅडोस दे लॉस गिगंटेस आणि पार्क नॅचरल डेल टीइड अप्रतिमच. या बेटांची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे आपल्याला परवडणाऱ्या विमानसेवांसोबत सर्वसमावेशक सुविधा इथे दिल्या जातात. तुमच्या खिश्याला कसलीही झळ न पोहोचवता कमी खर्चात प्रवास करता येणारी हि ठिकाणे तुमच्या जवळ अप्रतीम अश्या आठवणी ठेऊन जाईल.

  • वण्यसृष्टीच्या सानिध्यात – टाट्रा पर्वत, स्लोव्हाकिया: टाट्रा पर्वत हे कार्पाथियन पर्वत रांगेचा उच्चतम भागात स्थित आहे, जे तपकिरी अस्वल पाहण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. ग्रॅनाइट शिखरांचे चमकदार परिदृश्य, हिमयुगाची झीज आणि हिरवेगार कुरण, कदाचित तुम्हाला तिथे लांडगा हि दिसेल, लिन्क्स, रान डुक्कर आणि सुवर्ण गरूड उंचावर उडताना दिसू शकेल. टाट्रा पर्वत हे स्वस्त दरातील विमान सेवेत तुम्हाला उपलब्ध होतात.

  • स्की अवे! – बुल्गारिया: बुल्गारिया हे प्रसिद्ध आहे युरोपातील सवलतीच्या दरातील स्की ठिकाणांसाठी. येथील स्की अनुभव नवख्यां सोबतच अनुभवींसाठी देखील आहे. इथे कमी दरात तुम्ही अन्न, बियरवर जे पैसे खर्च करतात निश्चितच त्याचा योग्य परतावा तुम्हाला इथे मिळतो. योग्य वाटतंय ना?

  • द एड्रेनालाईन हाई – ट्रांसिल्वेनिया, रोमानिया: ट्रांसिल्वेनिया हा एक आपल्याला परवडणाऱ्या प्रवासांपैकी एक आहे. येथील सुट्ट्या अनके उपभोगांसाठी प्रसिद्ध आहे. ट्रान्ससिव्हलियन आल्प्स, हा पर्वतरांगातील पर्वत जो हायकिंग, घोड-दौड, रॉक-क्लाइम्बिंग, रिवर-राफ्टिंग आणि जंगलात कॅम्पिंगसाठी सुंदर ठिकाण आहे. उत्तम दरात ट्रांसिल्वेनिया येथे तुम्हाला विमानसेवा सोबतच राहण्यासाठी हॉटेल्स देखील उपलब्ध होतात.

  • मसाजची जादू – बुडापेस्ट: बुडापेस्ट हे प्रसिद्ध आहे आपल्या सुंदर स्पा साठी. सांस्कृतिक अनुभव घेण्यासाठी आपण आपल्या अलिशान अनुभवला बाजूला ठेऊन इथे तुम्ही प्राचीन स्नानगृहाची तुम्ही निवड करू शकता, एक वेगळा अनुभव घेऊ शकता. बुडापेस्ट जगात आपल्या माफत दरातील हॉलिडे डेस्टीनेशन साठी ओळखले जाते त्याच प्रमाणे हे सर्वस्तरातून स्वस्त आहे.

तर हे खरं आहे! फारसा खर्च न करता तुम्ही युरोपच्या भव्यतेचा आनंद घेऊन मंत्रमुग्ध होऊ शकता. हि एक स्वप्नपूर्ती आहे! नाही का? युरोप हॉलिडे पॅकेज मधून युरोपचा आनंद घ्या. आपले स्वप्न पूर्ण करा, ज्या तऱ्हेने तुम्हाला ते पूर्ण करायचे होते.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

*
*

Related Post