जेव्हा आपण भव्य किल्ले, राजमहाल, पराक्रमी वीर आणि सुंदर अश्या महाराणीं बद्दल विचार करतो, तेव्हा आपल्या समोर एक नाव येते आणि ते म्हणजेच राजस्थान ! भेट देणाऱ्या सर्वांनाच हि ‘ पराक्रमी राजांची भूमी ’ एका सुंदर राजेशाही थाटा सोबतच एका वेगळ्या आदरतिथ्यचा अनुभव देते. आणि हे उत्तमरीत्या अनुभवण्यासाठी तेथील भव्य अश्या हॉटेल्स मध्ये राहण्यासारखा दुसरा उत्तम पर्याय कोणता! आणि येथूनच उदयास आलेली ‘लिव लाईफ किंग साईज’ हि संकल्पना अनुभवण्यासाठी तुम्ही या आठ अश्या उत्तम हॉटेल्स ना नक्कीच भेट दिली पाहिजे. जे तुम्हाला आमच्या राजस्थान हॉलिडे पकेज मध्ये मिळतील.
उदयपुर मधील राजेशाही हॉटेल्स ची यादी
1. ताज लेक पॅलेस :
भारतातील एका सुंदर शहरात स्थित असलेले व सुरेखापणा आणि मोहकतेचे प्रतिक म्हणजे ताज लेक पॅलेस! असे हे पॅलेस पिचोला सरोवराच्या उजव्या बाजूला मध्यावर स्थित आहे जे ह्रदयांना स्पर्श करून त्यांना जवळ आणते. येथील आदरातिथ्य, शिष्टाचार आणि गुलाबी पाकळ्यांच्या वर्षावात होणारे स्वागत याच्या सुंदरतेत आणखीच भर टाकतो. आणि त्यातच अविस्मरणीय अशी होडीतील सफर, आरामदायी ‘स्पा’ आणि सोबत एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे संगीत या हॉटेलच्या भव्यतेची आपल्याला एक वेगळीच अनुभूती देतात. जेव्हा राजस्थान पर्यटन चा उल्लेख होतो तेव्हा या हॉटेलचे नाव अभिमानाने घेतले जाते. येथील जादू अनुभवण्यासाठी व नव्याने स्वताचा शोध घेण्यासाठी इथे नक्की भेट द्या.
2. ललित लक्ष्मी विलास पॅलेस :
भरतपूर स्थित, शंभर वर्षे जुना, विलक्षण मनमोहक असा ललित लक्ष्मी विलास पॅलेस ! या हॉटेलने इराण व अफगानिस्तान मधील अनेक शाही परिवार आणि वाइसरॉय यांचे आदरातिथ्य केले आहे. १९९४ मध्ये या महाल चे रुपांतर हेरीटेज हॉटेल मधे करण्यात आले तरी या हॉटेलचा एक भाग अजूनही राजपरिवाराचे निवास्थान आहे. या महालचे शाही व्यक्तित्व, सुंदर नक्षीकाम आपल्याला प्रत्येक खोलीत पाहायला मिळतील. ललित लक्ष्मी विलास पॅलेस हे उदयपुर मधील एक कल्पक आणि अप्रतिम अश्या हॉटेल्स पैकी एक आहे.
3. अमेट हवेली :
या पारंपारिक वास्तूची स्थापना महाराज जगत सिंह यांनी केली. जी वसलेली आहे पिचोल लेकच्या पश्चिम किनाऱ्यावर. अमेट हवेली हि राजपूत स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. आपले उत्तम आदरातिथ्य व लक्झरी सेवांसाठी या हवेली ने अनेक पुरस्कार हि पटकवले आहे. येथील अम्ब्राई हॉटेल मध्ये आपल्याला रुचकर अश्या भारतीय, कॉन्टिनेन्टल व चायनीज पदार्थांची उत्तम मेजवानी करायला मिळेल. तर मग या पारंपारिक राजपूत वास्तूला, आपल्या राजस्थान टूर पॅकेज मध्ये समाविष्ट करायला विसरू नका.
4. बोहेडा पॅलेस :
आपल्याला घरापासून दूर असूनही घराची भावना देणारे ठिकाण म्हणजे बोहेडा पॅलेस, जे अतिशय सुंदर आहे. हे उदयपुर शहराच्या मध्यभागी, अगदी शांत ठिकाणी स्थित आहे. सभोवताली असलेली असंख्य हरितसमृद्ध उद्याने बोहेडा पॅलेसच्या शांततेत अधिकच भर घालतात.
5. लेक पिचोला हॉटेल :
प्रसिद्ध लेक पिचोला हॉटेल, पिचोला सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावरील ब्रम्हापुरी बेटावर स्थित आहे. या हॉटेल बाबत उत्तम अशी बाब म्हणजे, हे हॉटेल त्या ठिकाणी स्थित आहे, ज्याच्या समोर पुरातन जगदीश मंदिर, स्नान घाट, तटबंदी असेलेली बगोर ची हवेली अगदी समोर आपल्याला पाहायला मिळते.
6. कांकरवा हवेली :
जुन्या थाटणीची कांकरवा हवेली, हि कांकरवा परिवाराची विरासत आहे, जी उदयपुर मध्ये स्थित आहे. गेली १८० वर्षे कंकरवा परिवार या हवेलीचा सांभाळ करीत आहे. या हवेलीच्या द्वारातील पायऱ्या आपल्याला अगदी स्वर्गानुभव देतात, आपण जणू स्वर्गाच्या पायऱ्या चढत आहोत असा भास आपल्याला देतात. येथील परिवार व मदतनीस येणाऱ्या अतिथींना सेवा देण्यासाठी कटिबद्ध असतात.
7. हॉटेल उदयगढ, उदयपूर :
गेल्या १५० वर्षापासून हॉटेल उदयगढचे जतन केले गेले आहे. याचे मूळ पारंपारिक पद्धतीने पुनर्संचय केले आहे. आपल्या पारंपारिक अनुभूतीने समृद्ध असणारे येथील राजवाडे, येथील राजेशाही पाहुणचार आपली वाट पाहत आहे. सुंदर अश्या अनुभवाची छाप सोडणारे हॉटेल मध्ये आपण बुकिंग करू शकता काही क्लिक मध्ये.
8. जयवान हवेली :
जयवान हवेली हि एकेकाळी ठाकूर जयवान यांचे निवास्थान होते, जे मेरवाडच्या जहांगिरदारां पैकी एक होते. चोवीस खोल्यांच्या जयवान हवेलीतून तुम्हाला अरावली पर्वत, मनमोहक अश्या सरोवराची संमोहित करणारी दृशे पाहायला मिळतात. येथील छतावर स्थित उपहारगृह अनेकांच्या आवडीचे ठिकाण बनले आहे.
उदयपुर मधील अति सुंदर पॅलेस हॉटेल्स आपल्याला एक अविस्मरणीय राजेशाही अनुभव देतील जो आपण कुठेही अनुभवलेला नसेल. राजस्थानच्या या पारंपारिक वास्तूकलेत आपल्या अंतर्भावाला शांत करा व येथील आदरातिथ्याचा नवतारुण्याने अनुभव घ्या.
Related Post
प्रत्येक गोष्ट जी केरळ बॅकवॉटर मधील बोटींविषयी आपल्याला माहित असायला हवी
कॉलेज सुरु होण्याआधी भेट देण्यासारखी १० ठिकाणे
5 भारतात या वन्यजीव अभ्यारण्यांस