जगातील हि नितांतसुंदर स्थळे तुम्हाला नक्की विस्मयचकित करतील


Wednesday, February 28, 2018

नैसर्गिक चमत्काराने जग तसे भरलेले आहे! तर त्या पैकी काहींशी आपण आज परिचित होवुया. आमची खात्री आहे जगातील हि सुंदर ठिकाणे तुमची देशाटन करण्याची उर्मी जागी करतील!

जगातील सुंदर ठिकाणांची यादी

1. फेअरी पुल्स ऑन द इस्ले ऑफ स्काय – स्कॉटलंड

जर मनमुरादपणे पोहण्याची तुमची इच्छा असेल, तर तुम्ही स्कॉटलंड मधील फेअरी पुल्सच्या बर्फाळ पाण्यात तो अनुभव नक्की घेतला पाहिजे. हा स्थित आहे ग्लेनब्रिटलच्या जवळील ब्लॅक कूलिन्सच्या पायथ्याशी, फेयरी पूल मधील निरभ्र पाणी व निर्सग साहस प्रेमींना एक थक्क करणारा आनंद देते.

2. रेंबो माउटंन्स, चीन

निर्सगाच्या रंगपेतीतून रेखाटलेल्या चीन मधील इंद्रधनू पर्वतरांगांकडून कलाकार एक चांगली प्रेरणा घेऊ शकतात. जे स्थित आहे झांग्ये डँन्ज़िया लॅंडफेअर भौगोलिक पार्कच्या आत, पाहायला गेलेत तर या इंद्रधनू पर्वतरांगा हुभेहूब इंद्रधनूसारख्या दिसतात. आपण जर जगातील सुंदर ठिकाणांना भेट देणार असाल तर याच नक्की विचार करा.

3. रेलाय बीच, थाईलंड

थाईलंड पर्यटनात रेलाय बीच हे गौरवशाली ठिकाण आहे. जे स्थित आहे क्रबी आणि एओ नांग शहरांच्या मध्यावर, रेलाय हे आपल्या नितळ पाण्यातून बाहेर पडणाऱ्या क्लिफस् चुनखडकसाठी प्रसिद्ध आहे.

4. नॉदर्न लाइट्स, आईसलंड

 

आईसलंड मध्ये प्रत्येक हिवाळ्यातील डोळ्यांची पारणे फेडणारी एक नैसर्गिक घटना म्हणजे नॉदर्न लाइट्स. जी अरोरा बोअरिलीस या नावाने देखील ओळखली जाते, उत्तर ध्रुव जवळील वरच्या वातावरणात सूर्य कणांच्या होणाऱ्या  परस्पर क्रियेमुळे या प्रकाशाची निर्मिती होते. हा अनुभव इतका अविस्मरणीय असतो कि ज्याला तुम्ही आजीवन विसरू नाही शकणार.

आमच्या आईसलंड टूर पॅकेज मध्ये नॉदर्न लाइट्स सुद्धा समाविष्ट आहे.

5. मार्बल केव्हर्नस ऑफ करैरा लेक – चिली

 

 

चिली मधील करैरा सरोवरच्या मार्बल केव्हर्नस अर्थातच संगमरवरी गुहा या जगातील अप्रतिम गुहा आहेत. पाण्याने भरलेल्या हे नयनरम्य गुहांचे क्लिष्ट जाळे, डौलदारपणे वसलेले आहे चिली मधील पॅटागोनिया स्थित जनरल करैरा सरोवरावर.

6. गालापॅगोस आईलंड

 

 

 

सुंदर असा हा गालापॅगोस द्वीप बनलेला आहे ज्वालामुखीच्या द्वीपसमूहा पासून, ज्याच्या नाजूक पर्यावरणात आपल्याला जैवविविधता पाहायला मिळते. हा स्थित आहे पॅसिफिक महासागरतील अमेरिकन दक्षिणखंडा पासून सुमारे 1,000 किमी अंतरावर. गालापॅगोस द्वीप यांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून देखील घोषित केले आहे.

7. कप्पादोकिया, तुर्की

 

हनीकोंब्ड पर्वत आणि कप्पादोकिया चे भव्य खडक तुम्हाला आपण मंगळ ग्रहावर आलो कि काय असे भास देतातच. त्याच प्रमाणे येथील हॉट एअर बलून ची सफर तुम्हाला तुर्की मधील कप्पादोकियाच्या एका अविस्मरणीय प्रदेशरचनेची ओळख करून देते.

आमचे तुर्की टूर पॅकेज तुम्हाला सुंदरतेने नटलेल्या कप्पादोकियाच्या आणखी जवळ आणतील.

8. अशिकागा फ्लॉवर पार्क: अशिकागा, जपान

सुंदरतेने नटलेले फुजी फुले पाहण्यासाठी अशीकागा फ्लॉवर पार्क हे उत्तम ठिकाण आहे. यात निळ्या, सफेद आणि गुलाबी रंगाची फुजी अधिकच भर घालतात. त्यात हिवाळ्यातील प्रकाशझोतामुळे त्याचे सौदर्य आणखीनच निरखून दिसते.

9. मिलफोर्ड साउंड, न्यूझीलंड

रुडयार्ड किपलिंगच्या मते मिलफोर्ड साऊंड हे जगातील आठवे आश्चर्य आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणाला भेट दिली तर त्याची सत्यता सांगण्यासाठी तुमच्याकडे सर्व कारणेही असतील. येथील आश्चर्यकारक भूदृश्ये व त्यांचा उदय आपल्याला फॉड्स पासून पाहायला मिळतो. आणि असेही ऐकण्यात येते कि याची घडण हि हिमयुग काळापासून झाली.

10. फोर सीजन्स, बोरा बोरा

नुकतेच ‘जगातील सर्वोत्तम बेट’ म्हणून पुरस्कार पटकावणारे हे बेट, बोरा बोरा चार ऋतूं मधील जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे. बोरा बोरा मधील लक्झरी हॉलिडे, आपला नवविवाह साजरा करण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे.

11. प्लीटवीस लेक नॅशनल पार्क, क्रोएशिया

जेव्हा १६ पारदर्शक सरोवर अकस्मातपणे आपपसात येऊन धबधब्यांचे एका मालिकेत रुपांतर करतात, तेव्हा तो पाहायला मिळणारा देखावा नयनरम्य ठरतो. हे घर आहे असंख्य सुंदर सरोवरांचे, लेणी व धबधब्यांचे, प्लीटवीस लेक राष्ट्रीय उद्यान हे क्रोएशिया मधील जगातील सर्वात सुंदर भूगर्भीय चमत्कार आहेत.

12. सेंटोरिनी, ग्रीस

सेंटोरिनी हे ग्रीस मध्ये पर्यटकांत भरपूर लोकप्रियता मिळवलेले ठिकाण आहे. सोबतच मागील बाजूस सागरात बुडालेला मुख्य काल्डेरा आणि लहान बेट हे येथील सुंदर व मुख्य आकर्षण, सेंटोरिनी खात्रीने जगातील सर्वोत्तम स्थळांपैकी एक आहे.

सेंटोरिनीने नेहमीच यूरोपच्या हॉलिडे पॅकेजेस मध्ये मुख्य स्थान मिळवलेले आहे.

13. मुन्नार, भारत

मुन्नारच्या सौम्य चढ उतार असलेल्या पर्वतावर सुंदर चहाची लागवड दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. तसेच मुन्नारची वळणावळ असलेले रस्ते नेहमीच आनंददायक अनुभव देतात. मुन्नार हा नेहमीच केरळ हॉलिडे पॅकेज भाग रहिला आहे.

14. एंटीलोप कॅनयन, यूएसए

अमेरिकेच्या हॉलिडे पॅकेज माध्यमातून या स्थळाला भेट द्या ज्यात तुम्हाला खोली, रुंदी, लांबी, खडकाचा रंग आणि सभोवतालच्या प्रकाशाचे अलौकिक संयोजन मिळेल. एंटीलोप कॅनयन हे दक्षिण-पश्चिम अमेरिकेतील एक अत्यंत सुंदर ठिकाण आहे. जे स्थित आहे नवाजो राष्ट्र भूमीवर, एंटीलोप कॅनयन हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्ही अवश्य भेट दिलीच पाहिजे.

15. शेख झायेद ग्रँड मशीद, युएई

१००० पेक्षाही अधिक खांबावर असलेले छप्पर व ८० पेक्षाही अधिक संगमरवरी कळस असलेले अबु धाबी मधील शेख झायेद मस्जिद, हि दुबई पर्यटनचा एक महत्वाचा भाग आहे. बर्फासामान शुभ्र असेलेली हि मस्जिद आपल्या उत्तम प्रकारे निगा राखलेल्या उद्याना सोबत आज भव्यपणे उंचावत आहे. जी नक्कीच जगातील अधिक सुंदर अश्या मस्जिदींच्या यादीत येते.

16. केकनहॉफ पार्क, नेदरलँड (ट्यूलिप फील्ड)

“गार्डन ऑफ युरोप” म्हणून ओळखले जाणारे, एम्स्टर्डममधील केकनहॉफ पार्क मध्ये लाखो दुमदुमणाऱ्या ट्यूलिप पाहायला मिळतात, त्याच सोबत ब्लूबेल सारख्या वसंतऋतूतील ब्लुम, डॅफोडिल्स, हायसिंथ देखील आपल्याला पाहायला मिळतात.

17. द ग्रेट बॅरीर रीफ, ऑस्ट्रेलिया

द ग्रेट बॅरीर रीफ हे पृथ्वीवर सर्वात जास्त काळापासून वास्तवात आहे. आपल्या आश्चर्यकारक सौदर्याने परिपूर्ण असलेल्या कोरल रीफ दररोज लाखो पर्यटक व प्रवास्यांना आकर्षित करतात.

18. लॅव्हेंडर फील्ड: प्रोवन्स, फ्रान्स

 

प्रोवन्स मधील लॅव्हेंडर फील्ड आपल्या सुगंधाने आणि सौंदर्याने नेहमीच आतल्या कलाकाराला प्रेरणा देतात. हे एक असे विलक्षण ठिकाण आहे जिथे तुम्ही आसपासच्या लोकांपासून लांब राहून शांतता मिळवू शकतात.

19. पमुक्कले, तुर्की

 

पांढरे शुभ्र चुनखडीचे खडक, पारदर्शी तलाव आणि प्रचंड धबधबे पमुक्कलेला वारंवार तुर्की मधील आकर्षक ठिकाण बनवतात ज्याचा अर्थ तुर्कीमधे ‘कापसाचा किल्ला’ होतो. पमुक्कले मध्ये ग्रीस-रोमन शहर हायरापोलिसचे अवशेष उत्तमरीत्या जतन केले आहे.

20. अंगकोर वाट, कंबोडिया

 

अंगकोर वाट हे कंबोडियातील सर्वात सुंदर स्थळांपैकी एक आहे. ज्यात आपल्याला अनेक प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. अंगकोर वाट हे आपल्याला ख्मेर राज्याच्या साम्राज्यातील सामाकालिन कंबोडियाची झलक देते.

21. सालार दे उयूनी, बोलिव्हिया

 

बोलिव्हिया मधील सालार दे उयूनी स्थित प्रागैतिहासिक सरोवर जे आता कोरडे पडले आहेत आणि आपल्या पाठीमागे त्याने मोठ्याप्रमाणावर शुभ्र-पांढरे मीठ, खडकांची घडण आणि भव्य लांबीचा कॅक्टि-स्टड द्वीप मागे सोडला आहेत.

22. व्हाईट हेवन बीच, ऑस्ट्रेलिया

 

व्हाईट हेवन बीच हे जगातील सुंदर बेटांपैकी एक बेट आहे, ज्यात सफेद रेती आणि नितळ पाणी यांचा संयोग या बेटाला जगातील शुद्ध बेट बनवतात. इथे हेलिकॉप्टरमधून दिसणारी सागरीदृश्ये आपल्या अंतर्मनाला सुखावून जातात.

आपल्याला देण्यासाठी ऑस्ट्रेलिया पर्यटनाकडे अनेक नैसर्गिक आश्चर्ये आहेत.

23. मेंडेनहॉल आइस केव्हर्नस, जुनेऊ, अलास्का

 

मेंडेनहॉल मधील लेणी अंशतः पोकळ लेणी आहेत ज्यांचे छत प्रकाशामुळे लुकलुकते. या हिमछादित भागावर ट्रेकिंग केल्याने आपल्याला बर्फच्या लेण्या, नाट्यमयरित्या नदीला गेलेले तडे आणि मोहक अश्या हिमभागाची घडण पाहायला मिळते.

हे निश्चितपणे जगातील सर्वात विस्मयकारक ठिकाणांपैकी एक आहे.

24. लेक हिलियर, ऑस्ट्रेलिया

हे गुलाबी सरोवर म्हणूनही ओळखले जाते, ऑस्ट्रेलियातील लेक हिलियर आपल्या गडद गुलाबी रंगाने तुम्हाला मोहित करतो. सरोवरील सौम्य गुलाबी रंग आणि महासागराचा निळा रंग यांचा योग हा अत्यंत दुर्मिळ आणि पारणे फेडणारा आहे.

जगातील या सुंदर ठिकाणांवर आपण जर गेला असाल किवा तुम्हाला असे वाटत असेल कि या यादी मध्ये आणखी काही ठिकाणे असावी तर तुम्ही आम्हाला ती कळवा अथवा खाली कमेंट मध्ये तुम्ही ती देऊ शकता.

Share This