जोडप्यांचे स्वर्ग : ७ प्रणयरम्य मोहक स्पा गेटवे


Wednesday, February 28, 2018

अनेकदा आपल्याला आश्चर्यपणे वाटत असते कि आपल्या नातेसंबंधात प्रणयता कुठेतरी मागे पडत आहे? आपण जर या गोष्टीने चिंताग्रस्त असाल तर चिंतित होऊ नका, आपल्यासारखे अनेक जण याच परिस्थितीत आहे. हा आपल्या शहराचा आपल्यावर होत असलेला परिणाम आहे, ज्यात आपल्याला हवा तसा वेळ, हवी तशी मोकळीक मिळत नाहीये. यावर एक सोपा उपाय म्हणजे पटकन आपल्या जोडीदारला तयार करा एका प्रणयरम्य अनुभवासाठी, ज्यातून तुम्हाला तुमच्या नात्यातील जवळीक पुन्हा निर्माण करता येईल, ती निर्माण करण्यासाठी मोहक स्पा खेरीज दुसरा पर्याय कोणता. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ७ आरामदायी प्रणयरम्य स्पा जे तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधात नाविन्यता आणण्यास मदत करतील व सोबत तुमचे नाते अधिक दृढ करेल.

रोमँटिक स्पा गेटवेज ची यादी

1. अमान्वना रिसॉर्ट, कूर्ग:

वेगवान शहरीजीवना पासून दूर असलेले अमान्वना रिसॉर्ट एक अलौकिक सौंदर्याचे विश्व आहे, जिथे तुम्हाला आपल्या आत्म्यासह अंतर्मनाला शांती मिळेल. इथे तुम्ही आपल्या प्रियजनाचा हात हातात घेऊन कावेरी नदीचा संथपणे आवाज ऐकू शकतात. येथे तुम्ही तुमच्या प्रांगणातील सुर्याकिरणात राहू शकतात किवा रात्री आकाशातील तारे पाहून त्यात स्वतःला हरवू शकतात. अमान्वना रिसॉर्ट मधील बंगल्यात येऊन मंत्रमुग्ध व्हा! येथील टवटवीत मसाज तुम्हाला नवतारुण्य देईलच त्याच सोबत येथील मोहक स्पा तुम्हाला एक लक्झरी अनुभव देईल, याहून आकर्षक अजून काय हवे?

2. कुमारकोम लेक रिसॉर्ट, केरळ:

केरळची संस्कृती आणि वास्तुकला यांचे परिपूर्ण मिश्रण म्हणजे कुमारकोम रिसॉर्ट. या रिसॉर्टचे निर्माण १६ व्या शतकातील पारंपारिक मानस ची पुर्नबांधणी करून केले गेले आहे. लक्झरी पॅव्हिलियन खोलीसह, खाजगी डोह, परंपरागत विलास सरोवराच्या सानिध्यात, आपल्या जवळील व्यक्तीसोबत तुम्ही इथे राष्ट्रपतींसारख्या सुविधेचा उपभोग घेऊ शकतात. येथील स्पा आपल्याला इतर रिसॉर्टपेक्षा एक अद्वितीय अनुभव देतो, येथील आयुर्वेदिक उपचार आणि पॅकेजेस हे तुमच्या शरीरास किंवा तुम्हाला असलेल्या कुठल्याही आजारावर मात करण्यासाठी मदत करतात. केरळच्या या प्रतीप्रवाहात या आणि मंत्रमुग्ध व्हा! हा सर्वात प्रतिष्ठीत प्रणयरम्य स्पा गेटवेज आहे.

3. ले पौंडी रिसॉर्ट, पॉन्डिचेरी (तामिळनाडू):

ले पौंडी रिसॉर्ट स्थित आहे पॉन्डिचेरी मधे, या केंद्रशासित प्रदेशात तुम्ही उत्तम आरामासह फ्रेंच स्वादांचा आस्वाद घेऊ शकता. चुन्नाम्बर नदी आणि बंगालच्या खाडी मध्यावर स्थित असलेले ले पौंडी खऱ्या अर्थाने पॉन्डिचेरीचे सौंदर्य परिभाषित करते! हे सर्वोत्तम प्रणयरम्य स्पा गेटवेअर्स पैकी एक आहे. येथे सरोवराच्या नयनरम्य दृष्यासोबत स्पा चा तुम्ही आनंद घेऊ शकता. यापेक्षा प्रणयरम्य अजून काय हवं?

4. पार्क हयात रिसॉर्ट आणि स्पा, गोवा:

जेव्हा तुम्ही पार्क हयात रिसॉर्ट मध्ये वास्तव करतात तेव्हा तुम्हाला तुमच्या निवडीची अलिशान नयनरम्य दृश्ये पाहता येतात. आपल्या आकर्षकतेसह सुंदरतेचे एक सुरेख मिश्रण म्हणजे हे रिसॉर्ट, ज्यात तुमच्या उत्कंठतेचा विचार केला आहे. हे गोव्यातील सर्वोत्तम ५ तारांकित हॉटेल्स पैकी एक आहे, जिथे तुम्ही आपल्या जोडीदारासह अलिशान व सुंदर अश्या आरामदायी स्पा चा आनंद घेऊ शकता. आमच्या गोवा पॅकेज माध्यमातून तुम्ही पार्क हयात रिसॉर्टला नक्की भेट देऊ शकता.

5. ट्री ऑफ लाईफ रिसॉर्ट एन्ड स्पा, जयपूर:

हे स्थित आहे शहरातील गर्दी बाहेर. ट्री ऑफ लाईफ रिसॉर्ट एन्ड स्पा हे जयपूर शहरातील उत्तम बुटिक रिसॉर्ट पैकी एक आहे. हे नक्कीच तुम्हाला ते स्थिरचित्त प्राप्त करून देते ज्याच्या तुम्ही शोधात असतात. हे प्राचीन काळातील आरवली पर्वतात वसलेले असल्याने इथे तुम्हाला विश्रांती सोबतच अफाट सुंदरतेची अनुभूती मिळते. या रिसॉर्ट मध्ये १३ आलिशान व्हिला असून, एकम येथील जोडीदारासह अनुभवलेला स्पा तुम्हाला जगातील चिंतापासून मुक्त करतो. राजस्थान मधील अनुभवणाऱ्या सुंदर गोष्टींपैकी हे एक आहे.

6. खैबर हिमालयन रिसॉर्ट आणि स्पा, गुलमर्ग (काश्मीर):

या ठिकाणी तुम्हाला पृथ्वीवरील स्वर्ग पाहायला मिळतो. आम्ही तुम्हाला सांगत आहोत कि हे एक जोडीदारांचे असे नंदनवन आहे ज्याला तुम्ही कदाही चुकवू नका! खैबर हिमालयन रिसॉर्ट हे एक जागतिक दर्जाचे रिसॉर्ट असून ज्यात तुम्हाला काश्मीरमधील प्रत्येक छोटी सुंदरता अनुभवता येते. येथील खैबर स्पा तुम्हाला भारतातील अलिशान व आरामदायी अनुभव देतो. इथे येऊन तुम्ही एकदा जर स्वताशी एकरूप झालात तर त्यातून पुन्हा बाहेर येण्याचा विचार तुमच्या मनात डोकावणार नाही.

7. टायगर हेवन रिसॉर्ट, रंथाबोरे:

हे स्थित आहे रंथाबोरे राष्ट्रीय पार्कच्या कड्यावर, टायगर हेवन रिसॉर्ट हे फक्त राहण्यासाठीचे ठिकाण नसून येथील स्पा साठी सुद्धा प्रसिद्ध आहे, जो तुम्हाला एक सुखसंपन्न अनुभव देतो. येथील वास्तुकला, राजपूत राजस्थानी शैलीमधील नक्षीकाम आपला श्वास रोखून ठेवतात. टायगर हेवन रिसॉर्ट हे सामिश्रण आहे जुन्या स्थापत्यात असलेल्या अलिशान स्पा चे, येथील मेजवानीचे व आरामदायी जागेचे. हा अनुभव घेण्याचे तसे प्रत्येक जोडीचे स्वप्न असते व हे जयपूर पर्यटनातील एक अभिमानाचे ठिकाण आहे.

छोट्या सुट्यांमध्ये तुम्ही या ७ प्रणयरम्य स्पा गेटवेज चा अनुभव घेऊ शकता, ज्या तुम्हाला असा आनंद देतील जो तुम्ही पूर्वी कधी हि अनुभवलेला नसेल! हि अशी ठिकाणे आहे जी तुम्हाला पुन्हा नवतारुण्य देतील जे तुम्हाला तुमच्या प्रियकरा सोबत पुन्हा प्रेमात पडायला भाग पडतील! अनेक जण हि हॉलिडे अनुभवण्याचे फक्त स्वप्न पाहतात पण तुम्ही ते आपल्या प्रियकरासोबत प्रत्यक्षात अनुभवू शकतात. तर कसली वाट पाहताय? पटापट बॅग भरा, आणि आपल्या प्रियकरासोबत तो अनुभवण्यासाठी तयारीला लागा!

Share This

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

*
*

Related Post