इंस्टाग्राम वर सर्वात लोकप्रिय असलेली १० ठिकाणे


Wednesday, February 28, 2018

या जगात प्रवास करायला कोणाला आवडत नाही! जर शक्य झालंच तर लोक कधीही न संपणाऱ्या प्रवासाला निघतील आणि मागे वळून पाहणारच नाहीत! अशावेळी आणखी एक गोष्ट जी लोकांना आवडते ती म्हणजे फिरायला गेल्यावर तिथे फोटो काढणे. आणि काढलेले हे फोटो इतरांना दाखवण्याचे एक उत्कृष्ठ माध्यम म्हणजेच “इंस्टाग्राम”. जगातील अद्भुत ठिकाणे दाखवणारी आणि इंस्टाग्राम वर सर्वात लोकप्रिय अशा ठिकाणांची आम्ही एक यादी तयार केलेली आहे. तेव्हा या ठिकाणांना भविष्यात नक्कीच भेट द्या.

इंस्टाग्राम वर लोकप्रिय अशी जगातील काही विलक्षण सुंदर ठिकाणे :

1. टाईम्स स्क़्वेयर, न्यूयॉर्क :

भव्य चौक, हजारो स्क्रीन्स, आकर्षक रोषणाई असलेले हे टाईम्स स्क़्वेयर जरी नैसर्गिक ठिकाण नसले तरीही हे प्रत्येक दृष्टीने भव्य आहे.

2. इस्तांबुल- इस्तिकलाल कॅड्डीसी :

बुटिक, संगीत आणि पुस्तकांशी निगडीत दुकाने, कला दालने, चित्रपटगृहे, वाचनालये यांपासून ते कॅफे, क्लब्स, नाईटक्लब्स, लाइव्ह म्युझिक, नावाजलेली व ऐतिहासिक अशी पेस्ट्री व केक, चोकोलेट मिळणारी दुकाने, उपहारगृहे असणारे असे हे इस्तिकलाल कॅड्डीसी हे इस्तांबुलमधील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या आणि छायाचित्रण केल्या जाणाऱ्या ठिकाणापैकी एक आहे.

3. बार्सिलोना – पार्क गेल :

पर्यटक आणि स्थानिक नागरिक जेव्हा बार्सिलोनायेथील पार्क गेलमधील शांततापूर्ण गार्डन्समध्ये भ्रमंती करतात, तेव्हा तेथील अप्रतिम छायाचित्रे आपणास त्यांच्या इंस्टाग्राम वर पाहायला मिळतात. बार्सिलोनाला भेट देणाऱ्या प्रत्येकालाच हे ठिकाण एका नंदनवनाची अनुभूती देते.

4. पॅरिस– आयफेल टॉवर :

प्रेमाचे प्रतिक म्हणून जगप्रसिद्ध, निशंकपणे २१व्या शतकातील स्थापत्याशास्त्रील एक महान कलाकृती तसेच विलक्षण सौंदर्य आणि अमर्याद मोहकता असलेले, पॅरिस शहराची शान म्हणजे आयफेल टॉवर होय. म्हणूनच हे ठिकाण त्याला इंस्टाग्राम वर लोकप्रिय अशा जगातील काही विलक्षण ठिकाणांपैकी एक बनवते.

5. सेंट पीटर्सबर्ग – नेव्स्की प्रॉस्पेक्ट :

४.४ किलोमीटर पेक्षाही विस्तीर्ण असे रस्ते असणाऱ्या सेंट पीटर्सबर्ग मधील नेव्स्की प्रॉस्पेक्ट, रेस्ट्रेलिस्क स्ट्रोगानोव्ह पॅलेस, विशाल नियोक्लासिक कझन कॅथेड्रल, आर्ट नोव्यू बुकहोल्ड, एलिसेएफ एम्पोरियम, अर्धा डझन 18 व्या शतकातील चर्च आणि अशी अनेक सुंदर ठिकाणे जिथे तुम्ही छायाचित्रण करू शकता.

6. दुबई – बुर्ज खलिफा :

830 मीटर उंचीची जगातील सर्वात उंच इमारत असल्या कारणाने बुर्ज खलिफा हे इंस्टाग्राम वर लोकप्रिय अशा जगातील काही विलक्षण ठिकाणांपैकी एक आहे. त्याच्या निरीक्षण डेक मधून आणि बाहेरून टाकलेला दृष्टीक्षेप आपला श्वास रोखून धरतो. अशी हि सोन्याची नगरी जगातील सर्वोत्तम शॅपिंग फेस्टिवल म्हणजेच दुबई शॉपिंग फेस्टिवल चे आयोजन करते. दुबईच्या आयकॉनिक साइट्सचा अनुभव घ्या- दुबई होलीडे पॅकेजेस.

7. साओ पाओलो – पारके इबिरापुएरा :

चालण्यासाठी, जॉगिंग आणि विश्रांतीसाठी भरपूर जागा असलेली सुंदर आणि शांत अशी इबिरापुएरा पार्क हिरवळीने नटलेली आहे. सर्वसाधारणपणे नेहमीच तरुणाइची जास्त गर्दी असल्यामुळे या पार्कचे फोटो इंस्टाग्रामवर नेहमीच अपलोड केले जातात. यामुळेच हि पार्क जगभरात प्रसिद्ध झाली आहे.

8. पेरू – माचू पिचू :

इतिहासाचा महत्वाचा भाग असलेले, प्राचीन आणि अतिशय उंचीवर असलेल्या माचू-पिचू या शहराला एकदा तरी नक्कीच भेट द्यावी. 13 चौरस किलोमीटरच्या परिसरात असलेले, विलक्षण प्राचीन वास्तुकलेचे घर असणारे हे ठिकाण इंस्टाग्राम वर लोकप्रिय अशा जगातील काही विलक्षण ठिकाणांपैकी एक असायलाच हवे यात शंका नाही.

9. लंडन – टॉवर ब्रिज :

१८९४ मध्ये लोकांसाठी खुले झाल्यापासून लंडन मधील टॉवर ब्रिज हे एक आकर्षण केंद्रबिंदू आणि ब्रिटीश राष्ट्रीय स्मारक बनले आहे. याची आश्चर्यकारक वास्तुकला आणि अद्वितीय रचना यामुळेच हे ठिकाण लंडन मधील सर्वात जास्त छायाचित्रण केले जाणारे ठिकाण आहे.

10. रोम – कोलोसिअम :

एकेकाळीच्या रोमन साम्राज्याच्या शक्ती आणि महानतेचे भव्य प्रदर्शन घडवणारे, कोलोसिअम सर्व पर्यटक आणि फोटोग्राफर यांच्या अग्रसुचीत आहे.

जेव्हा आपण जगातील नयनरम्य ठिकाणे आणि इंस्टाग्राम वर लोकप्रिय अशा जगातील काही विलक्षण ठिकाणांबद्दल बोलतो तेव्हा हि तर एक छोटीशी सूची आहे. जर आमच्याकडून काही ठिकाणे राहिली आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल जी या सूचित असायला हवी आहेत तर आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तोपर्यंत सामान बांधा, बाहेर पडा, आपल्या आजूबाजूचे जागांचे फोटो काढा आणि इतरांना पाहण्यासाठी इंस्टाग्रामवर शेअर करा!

Share This