8 देश जिथे भारतीय रुपया राजा आहे


Wednesday, February 28, 2018

परदेशांत फिरायला जाणे म्हणजे एक महाग प्रकरण म्हणून मानले जाते. अमेरिकन डॉलर्स आणि युरोच्या वाढत्या दरात, बहुतेक परदेशी देशांमध्ये होणारी यात्रा अशक्य वाटते. पण इतक्यात भारतीय रुपयाची ताकद कमीत समजू  नका. हे कदाचित अमेरिकन डॉलर किंवा पाउंडसारखे तितके सढळ नसेलही, परंतु अजूनही काही परकीय चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया जास्त मजबूत आहे. हे जाणून आश्चर्यचकित व्हाल आणि या आपण भारतीय चलनासह अनेक देशांमध्ये सुट्टीची योजना हि करू शकता. भारतीय रुपयासह जगभरात प्रवास करता येण्यासारख्या या सुंदर ठिकाणांचा आपल्या अग्रसुचीमध्ये नक्कीच समावेश करा. —

देश जेथे भारतीय रुपया मजबूत आहे 

1.  बेलारूस :

१ बेलारूसी रूबल = ३५.२७ भारतीय रुपया

व्हिसा: भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा आवश्यक 

बेलारूस खरोखरच एका अर्थाने युरोपचे एक रत्न आहे. उर्वरित खंडापैकी दूर बेलारूसला युरोपियन संघापासून              अलिप्त असल्याचा त्याला अभिमान आहे. साधी पण श्वास रोखणारी भूदृश्ये आणि नयनरम्य गावे आणि शहरे यांच्या माध्यमातून युरोपच्या शुद्ध स्वरूपाचा अनुभव घेता येतो. बेलारूसचा अनुभव घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तेथील विशिष्ट वनस्पती आणि त्या प्रदेशातील प्राणि होय.

2.  व्हिएतनाम : 

१ व्हिएतनामी डोंग = ०.००३० भारतीय रुपया      

 व्हिसा: भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा आवश्यक

व्हिएतनाम बद्दल सांगायचे म्हटले तर हा सर्वस्वी ग्रामीण प्रवास, हिरवेगार पाणी, सुंदर बेटे आणि जुन्या शहरातून मोकळ्या हवेतले जलपर्यटन होय. श्वास रोखून धरणारी नैसर्गिक आश्चर्ये आणि विशिष्ट वारसा हि या देशाची खासियत आहे. पवित्र बौद्ध मंदिरामधून हा देश अनुभवता येतो आणि त्याच्या विशिष्ट आणि उत्कृष्ट पाककृतीद्वारे येथील संस्कृतीचा आनंद घेता येतो. फ्रेंच स्थापत्याशास्त्र आणि युद्धाशी निगडीत संग्रहालये अशा शीर्ष आकर्षणे आपणास या देशाचा इतिहास समजून घेण्यास मदत करतात. व्हिएतनामच्या सौंदर्याचा अमुराद आनंद घेण्यासाठी पुरेसे परकीय चलन हाताशी ठेवायला विसरू नका.

3. आइसलँड : 

१ आइसलँडिक क्रोना = ०.५९ भारतीय रुपया

व्हिसा: भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा आवश्यक 

आइसलँड म्हणजे नैसर्गिक सौंदर्यानी नटलेली भूदृश्ये आणि उत्तरेला चमकणाऱ्या नैसर्गिक दिव्यांची रोषणाई! येथील उत्तरेकडील अप्रतिम सौंदर्य हे निसर्गप्रेमींना चकित करण्यास पुरेसे आहे. आइसलँडच्या या सौंदर्यात वाहताना मात्र आपल्या खिशाला थोडाही चिमटा पडत नाही! एक आइसलँडिक क्रोना फक्त       ०.५९ रुपये आहे.

 4. श्रीलंका :

१ श्रीलंका रुपया = ०.४५ भारतीय रुपया      

व्हिसा: इलेक्ट्रॉनिक ट्रॅवल असोसिएशन            

हिंदी महासागराने वेढलेली, मोहक आणि जादुची नागरी म्हणजे श्रीलंका! येथील अतुल्य समुद्रकिनारे म्हणजे   समुद्राप्रेमिंसाठी जणू नंदनवनच आहेत. निर्जन खंड, स्वागतप्रेमी लोक आणि सुंदर वन्यजीवन श्रीलंका    आपल्यासमोर सादर करते. हिंदी महासागरातील मोत्याप्रमाणे असणारा श्रीलंका जगातील नयनरम्य  देशांपैकी एक आहे.

5. पराग्वे : 

१ पराग्वेयन गुआरानी = ०.००१२ भारतीय रुपया      

व्हिसा: भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा आवश्यक

 पराग्वे या जुन्या शहराची मोहिनी आपणास भुरळ घालते आहे. हे कमी गर्दीचे, कमी ज्ञात असलेले आणि तरीही सुंदर आहे! बरेच प्रवासी पराग्वेकडे दुर्लक्ष करतात मात्र यामुळे ते विलक्षण अशा दक्षिण अमेरिकेचा अनुभव गमावत आहेत. आपण निश्चितपणे ते चुकवू इच्छित नाही कारण ते मनमोहक आणि परवडणारे दोन्ही आहे!

6.  चिली : 

१ चिली पेसो = ०.१० भारतीय रुपया

व्हिसा: भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा आवश्यक

चिलीचे मूळ सौंदर्य म्हणजे उंचच उंच शिखरे आणि त्यामधून उगम पावणाऱ्या नद्या यांचा संगम जे तुम्ही  इतरत्र कुठेच पहिले नसेल! हे डोंगराळ शहर आहे, जिथे आपण पाऊल ठेवले तर आपले हृदय येथे स्थायिक होईल आणि पुन्हा परत येण्यास नकार देईल. चिलीला भेट देणे आपल्याला परवडण्यासारखे आहे कारण एका चिलीयन पेसोची किंमत केवळ 0.10 रुपये इतकी आहे.

7.    नेपाळ :

१ नेपाली रुपया = ०.६२ भारतीय रुपया     

व्हिसा: भारतीय पासपोर्ट धारकांसाठी विनामूल्य प्रवेश 

नेपाळ हे पर्वतांच्या कुशीत वसलेले शांततेचे प्रतीक आहे. हे एक असे स्थान आहे जे आपण घेत      असलेल्या प्रत्येक पावलासह अधिकच उत्कंठा वाढवत जाते. आपण कमीत कमी खर्चात नेपाळच्या       भव्यतेचा आनंद घेऊ शकता. तर लवकरात लवकर आपण विमानप्रवासाचे तिकीट आगाऊ बुकिंग करा.

8.  कंबोडिया : 

१   कंबोडियन रिएल = ०.०१७ भारतीय रूपया      

व्हिसा: भारतीय पासपोर्ट धारकांच्या आगमननंतर व्हिसा

 मनमोहक मंदिरे आणि अद्भुत कलाकृती यांचे दुसरे नाव म्हणजे कंबोडिया! जंगल आणि धबधबे आपल्याला खात्रीने कंबोडियाच्या प्रेमात पडतात! कंबोडियाच्या वैचित्र्यपूर्ण इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला परवडणार्या कंबोडियाला नक्की भेट द्या कारण कम्बोडियन रीलची किंमत फक्त 0.017 रुपये आहे.  — आता आपाणास भारतीय रुपयाची ताकद माहीत आहे. तेव्हा आता आपल्या पसंतीच्या ठिकाणाची निवड करा आणि खरोखर सुंदर देशांचा अनुभव घेण्यासाठी जगभरात प्रवास करा.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

*
*

Related Post