भारतात होळी साजरा करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे


Wednesday, February 28, 2018

होळी सणावर भारतातील लोक अतोनात प्रेम करतात आणि होळीची आतुरतेने वाट हि पाहतात. या काळात भारतातील प्रत्येक रस्ता हा इंद्रधनुसारखा भासतो, ज्यावर रंगीबेरंगी रंगांची उधळण असते. या उत्सवादरम्यान लोकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. प्रत्येक ठिकाणाची होळी साजरा करण्याची एक वेगळी पद्धत असते. तेव्हा त्यातील काही सर्वोत्तम ठिकाणांचा नक्की अनुभव घ्या. कारण सर्वोत्कृष्ट उत्सव या प्रसंगाला अधिक खास बनवेल. भारतातील होळी साजरा करण्यासाठी १० सर्वोत्तम ठिकाणे : —

भारतात होळी साजरा करण्यासाठी ठिकाणांची यादी 

1. बरसाना, मथुरा :

राधेचे जन्मस्थळ असलेल्या बरसाना जिल्ह्यामध्ये नंदगावमधून मुले इथल्या मुलींशी होळी खेळण्यासाठी      येतात. आणि विशेष म्हणजे की त्यांचे रंगांऐवजी काठ्यांनी स्वागत करतात. म्हणूनच होळीला ‘लाठीमार होळी’ म्हणून ओळखले जाते. थॉमस कुक मथुरेच्या या होळीची विशेष ऑफर देते जी आपण चुकवू शकत नाही.

2. पुरुलिया, पश्चिम बंगाल :

पुरुलियामध्ये होळी रंगीत पावडर आणि पारंपारिक छउ नृत्य यांच्यासह साजरा केली जाते. आधी कधीही न पाहिलेले हे नृत्य पाहण्याची संधी आपण गमावू नये.

3. आनंदपूर साहिब, पंजाब : 

आनंदपूर साहिबमध्ये होळी फ़क़्त रंगाशी नाही तर शारीरिक कसरतींशी निगडीत आहे. मार्शल आर्ट्स      आणि भौतिक चपळता यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनासह हा सण साजरा करतात. अशी होळी पाहणे म्हणजे डोळ्यांसाठी एक विशेष पर्वणीच आहे!

4. वाराणसी : 

तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करणाऱ्या एका अद्भुत ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी होळीमध्ये वाराणसीला नक्कीच  भेट द्या. हे पवित्र स्थान होळीसाठी परिपूर्ण आहे. आमच्या वाराणसी होळी पॅकेजचा लाभ नक्की घ्या.

 5. उदयपूर, राजस्थान : 

उदयपूर येथे एक शाही होळी उत्सव आपली वाट पहात आहे! मेवाड शाही कौटुंब उदयपूरला येताना होणाऱ्या   घोड्यांच्या वैभवशाली मिरवणूकीचा आनंद घ्या. होळीच्या आधल्या रात्री हि मिरवणूक निघते. ज्यानंतर हे शहर संपूर्णपणे रंगात न्हावून निघते!

6. मुंबई, महाराष्ट्र : 

स्वप्नांच्या नागरीमध्ये होळीचा उत्सव साजरा करण्याचा आनंद वेगळाच आहे. मुंबईत रंगीबेरंगी रंगांसह आणि प्रत्येक रस्त्यावर उत्साहवर्धक संगीताने होळी साजरी होते. येथे अतीव उत्साहातील होळीच्या उत्सवाचा आनंद नक्की घ्या!

7.  जयपूर, राजस्थान :

जयपूरमध्ये होळी हा एक अद्वितीय अनुभव आहे. हत्ती हे या उत्सवाचा एक भाग आहेत आणि त्यांना वस्त्र आणि रंगांनी सुशोभित केले जाते . या उत्सवांमध्ये हत्तींची स्पर्धा आणि टग-ऑफ-वॉर यांचादेखील समावेश आहे. होळीप्रेमी जयपूर होळी पॅकेजचा नक्कीच आनंद घ्या.

8. गोवा :

आपण सुट्टीसाठी जेव्हा गोव्यात जाल तेव्हा होळीचं निमित्त नक्की साधा. गोव्यातील होळीला ‘शिमगा’ म्हणतात. आमच्या गोवा हॉलीडे पॅकेजेसच्या माध्यमातून बँड्स, शोभायात्रा आणि रात्रीच्या वेळी संगीत मेजवानीचा आनंदात इथली होळी साजरी करा.

 9. हंपी, कर्नाटक :

हंपीमध्ये पारंपारिक होळीचा अनुभव घ्या! होळीच्या दिवशी हंपी येथील ऐतिहासिक स्मारकांना रंगात न्हाऊन निघताना पाहून मंत्रमुग्ध व्हा. हंपीमध्ये दोन दिवस रंग आणि ढोलांच्या निनादात साजरा होणाऱ्या होळीचा आनंद घ्या.

10. इंदोर, मध्य प्रदेश :

होळीच्या दिवशी इंदौरच्या रस्त्यांवर मनमोकळेपणाने नृत्य करा कारण इथे होळी अशीच साजरी करतात!होळीला संपूर्ण शहर एकाच ठिकाणी एकत्र येऊन मनसोक्त नृत्य करतात.        —   आपणास होळीचा सण आवडत असल्यास वरीलपैकी एका तरी ठिकाणी नक्की भेट द्या. या प्रसंगासाठी केलेल्या आमच्या विशेष पॅकेजचा आनंद घेत आपल्या होळीमध्ये रंगांची आणखी भर घाला.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

*
*